टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 2: चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून यजमान संघाने दुसऱ्या डावात 1 बाद 54 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) 25 धावा आणि चेतेश्वर पुजारा 7 धावा करून खेळत होते तर यजमान भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंडवर 249 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर संपुष्टात  आल्यावर टीम इंडियाला दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी मिळाली आहे. यांनतर दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी संघाने शुभमन गिलच्या रूपात एक विकेट गमावली आहे. जॅक लीचने 14 वैयक्तिक धावसंख्येवर पायचीत करत माघारी धाडलं. दुसरीकडे, इंग्लंडकडून पहिल्या डावात विकेटकीपर बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 तर मोेहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 2nd Test 2021: विराट कोहलीच्या अपीलवर 'Whistle Podu' ने गुंजले चेपॉक, Video पाहत म्हणाल- वाह कॅप्टन!)

यापूर्वी, यजमान टीम इंडियाला पहिल्या डावाच्या दिवसाच्या सुरुवातीलाच 329 धावांवर बाद करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. संघ एका पाठोपाठ एक विकेट गमावत राहिला ज्यामुळे ते सामन्यात बॅकफूटवर ढकलले गेले. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने अश्विनने साथ देत प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. अश्विनने चेपॉकच्या खेळपट्टीचा फायदा घेत पाहुण्या संघाच्या 5 फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला. फोक्स (Ben Foakes) 42 धावा करून नाबाद परतला. त्याच्यापाठोपाठ ओली पोपने 22 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही इंग्लंडच्या खेळाडूला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर फोक्सने लीचच्या साथीने इंग्लंडला फॉलोऑनपासून वाचवले.

दुसरीकडे, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 88 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 300 धावा केल्या होत्या, परंतु दुसर्‍या दिवशी भारताला फक्त 29 अधिक धावा करता आल्या. रिषभ पंत संघाकडून 58 धावा करून नाबाद परतला. संघ अडचणीत असताना रोहित शर्माच्या 161 आणि अजिंक्य रहाणेच्या 67 धावांच्या जोरावर संघाने त्रिशतकी धावसंख्या गाठली. नंतर, फलंदाजांच्या शानदार खेळीचा फायदा घेत गोलंदाजांनी इंग्लंडच्या अडचणीत वाढ केली आणि एकाही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही.