(Photo Credit: Instagram)

भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) आयसीसी (ICC) विश्वकप 2019 मधील सामना रमणीय होता. फक्त या सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया ने विश्वकपच्या सेमीफाइनलमध्ये स्थान निश्चित केले म्हणून नाही. तर एका आजीबाईंमुळे हा सामना लक्षांत राहण्यासारखा बनला. टीम इंडियाचे मनोबल वाढवण्यासाठी बांगलादेशविरुद्ध सामन्यामध्ये तरुणांच्या बरोबरीने एका आजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. चारुलता पटेल (Charulata Patel), या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारख्या चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. (ICC World Cup 2019: 87 वर्षीय चारुलता पटेल वर उद्योगपती आनंद महिंद्रा मेहरबान, टीम इंडिया च्या उर्वरित मॅचसाठी दिली ही विशेष ऑफर)

या आजींनी प्रेक्षकांसोबत खेळाडूंचे ही लक्ष वेधून घेतले. सामना संपल्यावर भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने जाऊन आज्जीची भेट घेत उर्वरित सामन्यासाठी त्यांचा आशीर्वादही घेतला. दरम्यान, मॅच संपल्यानंतर विराटसोबतच्या भेटीबद्दल बोलताना चारुलता म्हणाल्या, 'विराट मला भेटायला आला आणि पायाही पडला. अशीच संघाची कामगिरी कायम ठेवण्यास मी त्याला सांगितले असून, संघाच्या कामगिरीसाठी प्रार्थनाही करत आहे'.

विराट ने त्यांच्यासोबत काही वेळ व्यतीत केला आणि त्याच्याबरोबरच्या संभाषणाविषयी त्या म्हणाल्या, 'उर्वरित सामन्यांसाठीही तुम्हाला स्टेडियममध्ये पाहायला आवडेल, असं विराटने सांगितले. तर, माझ्याकडे तिकीट नसल्याची खंत त्याच्याकडे व्यक्त केली. त्यावर त्याने तिकिटाची काळजी करू नका, मी तुम्हाला पास देतो, असे सांगितले आहे.'

दरम्यान, याआधी उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील या आज्जीचा उत्साह बहुल खूप खुश झाले आणि त्यांनी विश्वकपमधील भारताचे उर्वरित सामने बघण्यासाठी फ्री तिकीट देण्याची ऑफर दिली. भारताचा साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंका (Sri Lanka) शी 6 जुलै ला होणार आहे.