ICC World Cup 2019: 'ते माझ्या मुलांसारखे आहेत म्हणून त्यांना बघून मला आनंद होतो'- IND vs BAN मॅचमधील बिनधास्त आज्जीबाईं चारुलता पटेल
(Photo Credits: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वकप च्या भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया ने सेमीफाइनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात माहात्व्वाची भूमिका पार पडली ती भारताचे सलामीजोडी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के. एक राहुल (KL Rahul) यांनी. रोहित आणि राहुलच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी केली. पण या सामन्यात साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते एक आज्जीबाईंनी. या आज्जीबाईंनी सामन्यात फुल टू धमाल धमाल करताना दिसत होती. या आज्जीबाईंचे सामन्यातील फोटोज, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. (Team India ला प्रोत्साहन देताना पिपाणीवाल्या आजीबाईचा क्युटनेस पाहून सौरभ गांगुली, हर्षा भोगले यांच्यासह Social Media फिदा)

या आज्जीबाईंचे नाव चारुलता पटेल (Charulata Patel) असून त्या 87 वर्षांचा आहेत. या आज्जीबाई सामना पाहायला व्हिलचेअरवर आल्या होत्या. पण या आज्जीबाईंनी जी सामन्यात धमाल केली, तेवढा आनंद कुणालाही लुटता आला नाही. सामन्यादरम्यान बोलताना, चारुलता म्हणाल्या की त्यांचा जन्म तंजानियामध्ये झाला आणि सध्या त्यांची मुले क्रिकेट खेळत आहेत आणि म्हणूनच तो सतत क्रिकेट पाहत आहे. शिवाय त्यांनी असेही म्हटले की टीम इंडियाचे सर्व खेळाडू आपल्या मुलांप्रमाणे आहेत म्हणून त्यांना बघणे त्यांना आवडते.

दरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंना देखील या आज्जीबाईंना भेटायचा मोह आवरता आला नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित यांनीही या आज्जीबाईंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.