आयएसीसी (ICC) विश्वकपमध्ये आपल्या 'अपराजित' टॅग ने भारतीय संघ जितका चर्चेत आहे तितकाच खेळाडूंच्या दुखापतीसाठी ही आहे. आता पर्यंत एकही सामना न गमावलेल्या टीम इंडिया ला अजून एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. याआधी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) अंगठ्याच्या दुखापतीमुळं विश्वकपमधून बाहेर पडला होता आणि आता जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ही संघाबाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (भारत विरुद्धच्या सामान्याआधी विंडीज टीम ला मोठ धक्का; अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे वर्ल्डकप मधून बाहेर)
भुवनेश्वरला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्यात दुखापत झाली असल्या कारणाने त्याला अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध सामन्यासाठी मुकावे लागले होते. सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI), कडून भुवनेश्वरच्या फिटनेसबद्दल काहीही अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र, टीम व्यवस्थापनाने सोमवारी एका गोलंदाजा, नवदीप सैनी (Navdeep Saini), ला इंग्लंडमध्ये बोलावले होते. सैनी टीम इंडिया सोबत सर्व करणार. सैनीला फक्त नेट बॉलर म्हणून बोलावण्यात आले आहे, बीसीसीआयच्या मिडिया सेलने त्यांच्या अधिकृत व्हाट्सएप ग्रुपवर ही माहिती दिली.
टीम इंडिया (India) चा पुढील सामना वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी होईल. याआधी शिखर धवनच्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant) ला संघात स्थान देण्यात आले होते मात्र, त्याला अफगाणिस्तान सामन्यासाठी प्लेयिंग इलेव्हन मध्ये साठां मिळाले नाही.