(Photo Credit: ICC/Twitter)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये चौथ्या क्रमांकाच्या फलंदाज म्हणून अंबाती रायुडू (Ambati Rayudu) ची निवड न झाल्याने चाहते चांगलेच निराश झाले होते. त्यावेळी निवड समितीने अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) याला 3डी खेळाडू उल्लेख केला होता. आणि आता विजय दुखापतीमुळे विश्वकप बाहेर असल्यानेही, रायुडूला इंग्लंडमध्ये बोलाविले जाण्याची अपेक्षा केली होती, परंतु तसे झाले नाही. याच दरम्यान, आइसलँड (Iceland) क्रिकेट मंडळाने रायुडू आपल्या देशाचे नागरिकत्व देण्याची ऑफर दिली आहे.

आइसलँड क्रिकेट ने आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत म्हणाले, "अग्रवाल (मयांक) ने 72.33 च्या सरासरीने तीन विकेट्स आहेत जेणेकरुन अंबाती रायुडू आता 3 डी चष्मा काढून टाकू शकतो. आम्ही त्याच्यासाठी तयार केलेले कागदपत्र वाचण्यासाठी त्याला फक्त सामान्य चष्म्याची आवश्यक आहेत. अंबाती आमच्या बरोबर या. आम्हाला रायुडू च्या निगडित गोष्टी आवडतात."

दरम्यान, विश्वकपसाठी 15 सदस्यीय संघाची निवडीपूर्वी, भारताचा चौथ्या क्रमांकाच्या खेळाडू म्हणून रायडूचे नाव आघाडीवर होते. मात्र, जेव्हा संघाची निवड झाली तेव्हा रायुडू ऐवजी विजय शंकर ची निवड करण्यात आली होती. रायडूऐवजी निवडला गेलेला विजय विश्ववकपमध्ये काहीशी चांगली कामगिरी करू शकला नाही. विजयला शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या जागी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध संघात देण्यात आले होते. यंदाच्या विश्वकपमध्ये विजय 3 सामन्यात 58 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतले.