सलग तीन सामने जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ गुरुवारी ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर न्यूझीलंडशी दोन हाथ करेल. पण आता ट्रेंट ब्रिज येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तथापि, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारला दुपारच्या वेळेस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून इंग्लंडमध्ये सतत पाऊस पडत आहे आणि त्यामुळे कित्येक सामने रद्द करण्यात आले आहेत. शिवाय स्थानिक हवामान खात्याने निवासींसाठी हि एक चेतावणी जारी केली आहे.
आपले पह्लीए तीनही सामने जिंकून न्यूझीलंडची विजयी घोडदौड सुरूच आहे. अशात, भारत किवी संघाचा विजयीरथ रोखण्याचा प्रयत्न करतील. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामान्य आधीच, भारतीय संघाला मोठा हादरा लागला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन संघातून ३ आठवड्यांसाठी दुखापतीने बाहेर पडला आहे.