Hardik Pandya Dons BCCI Helmet (Photo Credits: Twitter)

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दुखापतीनंतर धमाकेदार पुनरागमन केलं आहे. हार्दिक पांड्याने डीवाय पाटील टी 20 (DY Patil T20 Tournament) स्पर्धेत खेळताना वादळी खेळी केली. त्याने आज केवळ 37 चेंडूत शतक पूर्ण केलं आहे. या शतकी खेळीत पांड्याने 10 षटकार आणि 7 चौकार मारले. हार्दिक पांड्याच्या या खेळीमुळे त्याला आणखी आत्मविश्वास मिळणार आहे.

सध्या सुरू असलेल्या डीवाय वाय. पाटील टी -20 स्पर्धेत कॅगविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या नायक ठरला. पांड्याच्या आजच्या कामगिरीचं सर्वांनी कौतुक केल आहे. रिलायन्स वन टीमकडून खेळताना पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. पांड्याने सुरुवातीलाच जोरदार फलंदाजी करत गोलंदाजाला आव्हाण दिलं. विशेष म्हणजे पांड्याने केवळ 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर केवळ 12 चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं. या 12 चेंडूत पांड्याने 51 धावा केल्या. (हेही वाचा - Women's T20 World Cup 2020: भारत-इंग्लंड महिला संघात रंगणार टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचा थरार, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आमने-सामने)

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गेले 6 महिने क्रिकेटपासून दूर होता. गेल्या वर्षी हार्दिकच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर हार्दिकला कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. आता तो पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना दिसणार आहे. सध्या तो डीवाय पाटील टी-20 लीगमध्ये रिलायन्स संघाकडून खेळत आहे. भारतीय संघासाठी हार्दिक पांड्याचा कमबॅक महत्त्वाचा समजला जात आहे.