दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडिज (West Indies) महिला संघातील आयसीसी महिला टी-20 च्या बी गटातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. लीग फेरीतील हा अंतिम सामना असल्याने सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ आमने-सामने येणार असल्याचं निश्चित झालं आहे. आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये (ICC Women's T20 World Cup) भारतीय संघाचा (Indian Team) आजवरचा प्रवास एख्याद्या स्वप्नासारखा आहे. त्यांनी अजिंक्य राहून सेमीफायनल फेरी गाठली आहे. त्यांनी अ गटात 0.979 च्या रेटने 8 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसरे स्थान पटकावले आहे. यावेळी भारताच्या यशोगाथाचे एक कारण म्हणजे 16 वर्षीय फलंदाज शफाली वर्मा. तिने आजवर 161 च्या स्ट्राईक रेटने 161 धावा केल्या आहेत. बी गटात दक्षिण आफ्रिका 7 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी 3 सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. इंग्लंड संघ सहा गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे. (Women's T20 World Cup 2020: सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला लागला मोठा झटका, मुख्य अष्टपैलू एलिस पेरी स्पर्धेतून Out)
गुरुवारी सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय महिला संघ पहिला सेमीफायनल सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. तथापि, गुरुवारी पाऊस सामन्याची मजा खराब करू शकतो. सामन्यातील दुसरा सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याच मैदानावर होईल. विजेते आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2020 च्या अंतिम सामन्यात पोहचतील. हा सामना 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी एमसीजीमध्ये खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2009 मध्ये इंग्लंडने पहिले महिला टी-20 विश्वचषक जिंकले.
The #T20WorldCup semi-final draw:
3pm local time: 🇮🇳 v 🏴
7pm local time: 🇿🇦 v 🇦🇺
Who are you backing to make it to the final? pic.twitter.com/ar3vcAI7Re
— T20 World Cup (@T20WorldCup) March 3, 2020
सिडनी येथे झालेल्या ग्रुप टप्प्यातील अंतिम सामन्यात पावसामुळे कोणताही खेळ शक्य नसल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोघांनाही एक-एक गुण देण्यात आले आल्याने सेमीफायनलची स्थिती निश्चित झाली.