पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी झाला पाचव्यांदा बाप, पत्नी नादियाने दिला कन्यारत्नाला जन्म; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
Shahid Afridi blessed with 5th Daughters (PC - Instagram)

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Former Pakistan Cricketer Shahid Afridi) पाचव्यांदा बाप झाला आहे. शाहिद आफ्रिदीची पत्नी नादियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला आहे. शाहिद आफ्रिदीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलीचा फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. ही गोड बातमी ऐकल्यानंतर शाहिद आफ्रिदीच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलीचा फोटो शेअर करताना शाहिद आफ्रिदीने 'ईश्वराचा आशिर्वाद आणि दया माझ्यावर कायम आहे. मला ईश्वराने याअगोदर 4 गोंडस मुली दिल्या आहेत. आता आणखी एका मुलीचा जन्म झाला आहे. तुमच्या सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर करत आहे,' अशी कॅप्शनही दिली आहे. (हेही वाचा - Ranji Trophy: अरुणाचलच्या राहुल दलाल ने रणजी ट्रॉफीमध्ये केल्या दुसर्‍या सर्वाधिक धावा, व्हीव्हीएस लक्ष्मण चा रेकॉड अजूनही अबाधित)

काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये आपली मुलगी हिंदू धर्माचे पालन करताना दिसल्याने आफ्रिदीने रागाने टीव्ही फोडल्याचे त्याने कबूल केले होते. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याने हा किस्सा शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अॅंकरने त्याला 'तुम्ही टीव्ही का फोडला' असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, 'स्टार प्लस ही भारतीय वाहिनी पाकिस्तानातही दाखवली जाते.

या वाहिनीवरील काही मालिका माझी पत्नीही पाहते. त्यांत खूप ड्रामा असतो म्हणून ते पाहू नको, असं मी माझ्या पत्नीला सांगितलं होतं. एक दिवस मी घरात असताना माझी मुलगी भारतीय मालिकेतील दृश्य पाहून आरतीचं ताट घेऊन आरती करत होती. हे पाहून मला प्रचंड राग आला आणि मी थेट टीव्हीच फोडून टाकला,' असं आफ्रिदी म्हणाला होता. त्यावेळी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.