सचिन तेंडुलकर ला कृषी कायद्यासंदर्भातील ट्विट बद्दल सल्ला दिल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नागरिकांनी व्यक्त केला संताप
शरद पवार आणि सचिन तेंडुलकर (Photo Credits ANI & Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी भारत रत्न मिळालेल्या सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याला विचार करुन बोलण्याचा सल्ला दिल्याने सोशल मीडियात युजर्सकडून त्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकांनी शरद पवार यांच्या विधानाला सचिन तेंडुलकर याला धमकी दिल्याचे म्हणत भाष्य केले आहे. त्याचसोहत सोशल मीडियात युजर्संनी देशाचे नाव मोठे करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कतृत्वाबद्दल सांगत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.(आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी घ्यावी, शरद पवारांचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सल्ला)

खरंतर शरद पवार यांनी अमेरिकेतील पॉप सिंगर रिहाना हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केल्यानंतर सचिन तेंडुलकर याने सुद्धा त्यात सहभाग घेतला. पण त्यावर शरद पवार यांनी असे म्हटले की,त्याने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर लोकांनी कठोर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे मी सचिन याला सल्ला देतो की, अन्य क्षेत्राबद्दल बोलताना सावधगिरी बाळगावी.('लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या भारतरत्नांची प्रतिष्ठा सरकारने 'अशा' गोष्टींसाठी पणाला लावू नये'- राज ठाकरे)

शरद पवार यांनी केलेल्या या ट्विट नंतर लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. एका युजरने असे म्हटले की, शरद पवार महाराष्ट्रातील सत्तेत आहेत. ते राज्यातील स्थानिकाला खुल्यापणाने बोलण्यासाठी धमकी देत आहेत. त्यांच्या नजरेत रिहाना हिच्यावर टीका करतात ते खलनायक आहेत. तर अन्य एका युजरने म्हटले की, येथे शरद पवार सचिन तेंडुलकर यांना भारत समर्थक भूमिका घेण्याचा इशारा देत आहेत.