Dinesh Kartik RCB Batting Coach: दिनेश कार्तिकवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा बॅटिंग कोच (Dinesh Karthik RCB Batting Coach)आणि संघ मार्गदर्शक (Dinesh Karthik Mentor)म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दिनेश कार्तिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून संघात सामील झाला आहे. (हेही वाचा:Team India Head Coach: श्रीलंका क्रिकेट मालिकेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व नव्या मुख्य प्रशिक्षकाकडे- बीसीसीआय )
'आमच्या रक्षकाचे सर्व अर्थाने स्वागत आहे. दिनेश कार्तिकचे RCB मध्ये परत नवीन अवतारात आगमन झाले. डीके हे आरसीबी पुरुष संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असतील,' अशी आरसीबीने X वर केली आहे. 'तुम्ही माणसाला क्रिकेटमधून बाहेर काढू शकता पण क्रिकेटला माणसातून बाहेर काढू शकत नाही! त्याच्यावर सर्व प्रेमाने वर्षाव करा, 12 वी मॅन आर्मी.' कार्तिकने त्याच्या 39 व्या वाढदिवशी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
पोस्ट पहा-
JUST IN - Dinesh Karthik named RCB's new batting coach and mentor
👏👏👏 pic.twitter.com/bma8rqbZsc
— Cricbuzz (@cricbuzz) July 1, 2024
'काही काळ खूप विचार केल्यावर, मी स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मी अधिकृतपणे माझ्या निवृत्तीची घोषणा करतो आणि माझ्या खेळाचे दिवस माझ्या मागे ठेवतो. कारण मला पुढे येणाऱ्या आव्हानांचा सामना करायचा आहे,' असे कार्तिकने सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर केले होते.
निवृत्तीची घोषणा करताना त्याने सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले होते. 'मी माझे सर्व प्रशिक्षक, कर्णधार, निवडकर्ते, संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हा दीर्घ प्रवास आनंददायी बनवला. आपल्या देशात खेळ खेळणाऱ्या लाखो लोकांपैकी मी स्वत: ला भाग्यवान समजतो. ज्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली,” कार्तिकने आपल्या निवेदनात पुढे म्हटले.
दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 257 सामने खेळले आणि 26.32 च्या सरासरीने 4,842 धावा केल्या. कार्तिक आरसीबी व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून तो खेळला आहे. त्याशिवाय, दिनेश कार्तिकने 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1,792 धावा आणि 9 अर्धशतके केली आहेत. कसोटीत, कार्तिकच्या नावावर 1,025 धावा आहेत. ज्यात बांगलादेशविरुद्ध 42 डावांमध्ये शतकाचा समावेश आहे. T20 मध्ये त्याने 60 सामन्यात 686 धावा केल्या आहेत.