Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 1st T20I Match 2024 Live Streaming: झिम्बाब्वे-पाकिस्तान संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजल्यापासून उभय संघांमधील सामना खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी नव्या सुरुवातीची संधी असेल. टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वे संघाला पुनरागमन करायचे आहे. तर पाकिस्तानही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3-0 अशा पराभवानंतर पुन्हा गती मिळवण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाला आपल्या वेगवान गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे, तर झिम्बाब्वेला आपल्या घरच्या मैदानावर विजयाची आशा आहे. घरच्या मैदानावर खेळणारा झिम्बाब्वे संघ या मालिकेत नवी सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. अनुभवी सिकंदर रझा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. सिकंदर रझा बॅट आणि बॉल दोन्हीने चमत्कार करू शकतो. ब्रायन बेनेट, तदिवनाशे मारुमणी, डिऑन मायर्स, रायन बर्ल हे खेळाडू फलंदाजीत महत्त्वाच्या भूमिका बजावतील.
गोलंदाजीची संपूर्ण जबाबदारी ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरवा यांच्यावर असेल. या वर्षी मुझराबानीने आतापर्यंत 22 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तानला आपल्या युवा खेळाडूंच्या बळावर ही मालिका जिंकण्याची आशा असेल. संघाचे कर्णधारपद सलमान आगाकडे आहे. यासोबतच संघात अनेक नवे चेहरे आहेत. फलंदाजीची कमान साहिबजादा फरहान, उस्मान खान आणि तय्यब ताहिर या खेळाडूंच्या हाती असेल. अब्बास आफ्रिदी गोलंदाजीत संघात महत्त्वाची भूमिका बजावेल. अब्बास आफ्रिदीशिवाय हॅरिस रौफ, मोहम्मद हसनैन आणि सुफयान मुकीम यांच्यावरही नजर असेल.
हेड टू हेड रेकॉर्ड
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात पाकिस्तान संघाचे पारडे जड झाले आहे. पाकिस्तान संघाने 16 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना कधी होणार?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. तर नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कुठे पाहायचा?
भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेचे प्रसारण होणार नाही. तथापि, झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून पहिल्या टी-20 सामन्याचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन
झिम्बाब्वे: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, रायन बर्ल, क्लाइव्ह मदांडे, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, वेस्ली माधवेरे, ब्रँडन मावुता, ताशिंगा मुस्कीवा.
पाकिस्तानः सलमान आगा (कर्णधार), साहिबजादा फरहान, हसिबुल्ला खान, उस्मान खान, तय्यब ताहिर, इरफान खान, जहांदाद खान, हॅरिस रौफ, सुफियान मुकीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन.