![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/brian-bennett-1.avif?width=380&height=214)
Zimbabwe National Cricket Team vs Ireland National Cricket Team, 1st ODI Match 2025 Scorecard: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) पहिला सामना आज म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club) खेळला जात आहे. यापूर्वी, दोन्ही संघांमध्ये बुलावायो येथे एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला होता. आयर्लंडने हा सामना 63 धावांनी जिंकून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. मात्र, आता सर्वांच्या नजरा एकदिवसीय मालिकेवर आहेत. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक मालिका अपेक्षित आहे. या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेग एर्विन (Craig Ervine) करत आहे. तर आयर्लंडचे नेतृत्व पॉल स्टर्लिंगकडे (Paul Stirling) आहे.
पाहा पोस्ट -
Zimbabwe posted 299 on the board!#ZIMvIRE pic.twitter.com/fph1QypLk9
— Caught & Bowled (@caught1bowled) February 14, 2025
पहिल्या एकदिवसीय सामन्यात, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, झिम्बाब्वे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांची सुरुवात उत्कृष्ट झाली कारण दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि एकूण 95 धावा केल्या.
झिम्बाब्वे संघाने निर्धारित 50 षटकांत पाच गडी गमावून 299 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून
दुसरीकडे, आयर्लंड संघाला पहिले मोठे यश मिळाले. आयर्लंडकडून मार्क अदायरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मार्क अडायर व्यतिरिक्त अँडी मॅकब्राइन आणि जोशुआ लिटल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी आयर्लंड संघाला ५० षटकांत ३०० धावा कराव्या लागतील.
पहिल्या डावातील धावफलक:
झिम्बाब्वे फलंदाजी: २९९/५, ५० षटकांत (ब्रायन बेनेट १६९, बेन करन २८, क्रेग एर्विन ६६, वेस्ली मधवेरे ८, सिकंदर रझा ८, जोनाथन कॅम्पबेल ६ नाबाद, तादिवानाशे मारुमानी २ नाबाद)
आयर्लंड गोलंदाजी: (मार्क अडायर ३ बळी, अँडी मॅकब्राइन १ बळी आणि जोशुआ लिटल १ बळी).