Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 3rd ODI Match 2024 Scorecard Update: राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (ZIM vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा - ZIM vs AFG 3rd ODI 2024 Live Toss Updates: निर्णयाक सामन्यात अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11 )
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 24 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. 30.1 षटकात केवळ 127 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेसाठी स्टार फलंदाज शॉन विल्यम्सने सर्वाधिक 60 धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान शॉन विल्यम्सने अवघ्या 61 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले. शॉन विल्यम्सशिवाय सिकंदर रझाने 13 धावा केल्या.
दुसरीकडे, एएम गझनफरने अफगाणिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानसाठी एएम गझनफरने सर्वाधिक 5 बळी घेतले. एएम गझनफरशिवाय राशिद खानने तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 50 षटकात 128 धावा करायच्या आहेत. अफगाणिस्तान संघाला हा सामना जिंकून मालिका काबीज करायची आहे.