ZIM vs AFG 3rd ODI 2024 Live Toss Updates: निर्णयाक सामन्यात अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.

ZIM vs AFG 3rd ODI 2024 Live Toss Updates: निर्णयाक सामन्यात अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
AFG vs ZIM (Photo Credit - X)

imbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team 3rd ODI 2024: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (ZIM vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सेदीकुल्ला अटल, अब्दुल मलिक, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), बिलाल सामी, रशीद खान, एएम गझनफर, फरीद अहमद मलिक

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): बेन कुरान, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), जॉयलॉर्ड गुम्बी, क्रेग एर्विन (कर्णधार), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, ब्रायन बेनेट, वेलिंग्टन मसाकादझा, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नगारावा, ट्रेव्हर ग्वांडू

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2024 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).