Photo Credit- X

Zimbabwe National Cricket Team vs Ireland National Cricket Team Only Test 2025: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (ZIM vs IRE) यांच्यातील एकमेव कसोटी सामना आज 6 फेब्रुवारी रोजी क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो (Bulawayo)येथे खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा दुसरा कसोटी सामना असेल. त्याशिवाय, आयर्लंडचा झिम्बाब्वेमधील हा पहिला कसोटी सामना असेल. या सामन्यात झिम्बाब्वेचे नेतृत्व त्यांचा नियमित कर्णधार क्रेग एर्विनकडे असेल. झिम्बाब्वेचा शेवटचा कसोटी विजय 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होता. तेव्हापासून ते सलग नऊ सामन्यांमध्ये विजयविरहित राहिले आहेत. अलिकडेच, त्यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत 1-0 असा पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे, आयर्लंडने 2024 पासून खेळलेले दोन कसोटी सामने जिंकले आहेत आणि गेल्या वर्षी झालेल्या एकमेव कसोटीत त्यांनी झिम्बाब्वेचा 4 गडी राखून पराभव केला होता. धावांचा पाठलाग करताना (चौथा डाव) पहिल्या पाच विकेट्स 25 धावांपेक्षा कमी धावांत गमावल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामना जिंकणारा आयर्लंड हा पहिला संघ आहे. (Team India New Jersey: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दिसणार नवीन जर्सीत; बीसीसीआयने शेअर केले फोटो (See Photo))

पिच रिपोर्ट

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. मात्र, सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे खेळपट्टीची स्थिती थोडी बदलू शकते. कसोटी सामना जसजसा पुढे जाईस तसतसा फिरकी गोलंदाजांना खेळण्याची संधी मिळेल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण या मैदानावर खेळल्या गेलेल्या 27 कसोटी सामन्यांमध्ये, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 12 वेळा सामना जिंकला आहे.

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमधील कसोटी सामन्यांची आकडेवारी

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये आतापर्यंत एकूण 27 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 वेळा विजय मिळवला आह. तर दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय 10 सामने अनिर्णित राहिले.

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: 312

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या: 401

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सरासरी तिसऱ्या डावातील धावसंख्या: 216

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सरासरी तिसऱ्या डावातील धावसंख्या: 177

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्वाधिक धावा आणि विकेट्स कोणाच्या नावे?

क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेच्या अँड्र्यू फ्लॉवरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. अँड्र्यू फ्लॉवरने 11 कसोटी सामन्यांमध्ये 2,382 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. या मैदानावर अँड्र्यू फ्लॉवरची सरासरी 51.23 आहे. याशिवाय क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या हीथ हिल्टन स्ट्रीकच्या नावावर आहे. हीथ हिल्टन स्ट्रीकने 14 कसोटी सामन्यांमध्ये 32.40 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संघांचे खेळाडू

झिम्बाब्वे: जॉयलॉर्ड गुम्बी (विकेटकीपर), क्रेग एर्विन (कर्णधार), बेन कुरन, ब्रायन बेनेट, ताकुडझवानाशे कैतानो, व्हिन्सेंट मासेकेसा, निक वेल्च, शॉन विल्यम्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामुरी, ब्लेसिंग मुझाराबानी

आयर्लंड: ए बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), पीटर मूर, पॉल स्टर्लिंग, क्रेग यंग, ​​हॅरी टेक्टर, मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, मॅथ्यू हम्फ्रीज, बॅरी मॅकार्थी, अँडी मॅकब्राइन