(Photo Credit: Instagram)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अनुभवी अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) आपल्या क्रिकेटच्या दिवसांचे फोटोज सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करत असतो. भारतीय संघाचा (Indian Team) सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज, 10 जून 2019 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. 2000 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 3 ऑक्टोबर 2000 ला त्याने केनिया (Kenya) विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु जेव्हा दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळाली तेव्हा त्याने 80 चेंडूत 84 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने 12 शानदार चौकार लागले होते. याच दिवसाची आठवण युवराजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत काढली. (युवराज सिंह याने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'Chikna Chamela' लुकचा फोटो, त्याचा लठ्ठपणा पाहून सानिया मिर्झा ने केली खोचक कमेंट)

युवराजने त्याच्या पहिल्या दौऱ्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत युवराजसह राहुल द्रविड आणि विजय दहिया दिसत आहेत. यवराजने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले, "प्रथमच टीम इंडियाकडून खेळण्यासाठी निवडले गेल्यावर, मेजर थ्रोबॅक…" 3 ऑक्टोबर 2000 रोजी युवी आणि विजय दहियाने केनियाविरुद्ध पदार्पण केले होते आणि विशेष म्हणजे या दोन्ही फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. याचे कारण म्हणजे, भारतीय संघाला तेव्हा 209 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी केवळ 2 गडी गमावून गाठले.

 

View this post on Instagram

 

Major throwback to getting selected for the first time to play for team India 🇮🇳 . #proudmoment #pricelessmemory

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

2011 च्या विश्वचषकात युवराजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने 9 सामन्यांच्या 8 डावांमध्ये 90.5 च्या प्रभावी सरासरीने एकूण 362 धावा केल्या आणि यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट 86.19 होता. 2011 च्या विश्वचषकात युवीने एकूण एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली होती. फलदांजीनंतर युवीने या स्पर्धेत गोलंदाजीने दाखल कमाल केली आणि एकूण 15 गडी बाद केले होते. त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर या विश्वचषकात त्याला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवडले गेले.