युवराज सिंह याने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'Chikna Chamela' लुकचा फोटो, त्याचा लठ्ठपणा पाहून सानिया मिर्झा ने केली खोचक कमेंट
युवराज सिंह आणि सानिया मिर्झा (Photo Credit: Instagram)

क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला टीम इंडियाचा 'सिक्सर किंग' युवराज सिंह (Yuvraj Singh) आपल्या मोकळ्या काळात त्याच्या लूकमध्ये बदल करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दाढीत दिसत असलेल्या युवराजने सोशल मीडियावर आपल्या नव्या लूकमधील एक फोटो शेअर केले होता. यंदा युवराजने त्याच्या क्लीन-शेवमधील फोटो शेअर केला. युवराजने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो फ्लाईटमध्ये त्याच्या सीटवर बसून पाऊट करताना दिसतोय. तो फोटो शेअर करत युवराजने कॅप्शन दिले, ''नवीन लुक, चिकना चमेला, मला पुन्हा दाढी वाढवायाला हवी का'. युवीच्या या प्रश्नावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. काही म्हणाले की, जुना युवराज पुन्हा परतला आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला युवराज नेहमी क्लीन-शेव करून असायचा. पण, या फोटोवर टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) ने त्याला ट्रोल केले आहे. युवराजच्या या फोटोवर कमेंट करताना सानियाने त्याला दाढी परत आणण्यास सांगितले. (युवराज सिंह ने केला मोठा खुलासा, 2019 विश्वचषक दरम्यान निवृत्तीची घोषणा करण्यामागे 'हे' होते कारण)

युवराज आणि सानिया यांच्यात खूप चांगली बॉन्डिंग आहे. दोन्ही खेळाडू अनेकदा पार्ट्यांमध्येही सोबत दिसतात. युवराजच्या या पोस्टवर सानियाने टिप्पणी केली की, "आपण चिनच्या खाली डबल चीन लपविण्यासाठी पाऊट करत आहात का ??? आपली दाढी परत आणा." दरम्यान, सोशल मीडियावर युवराजचा हा नवीन लूक खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांना त्याचा फोटो खूप आवडत आहे आणि युवराजच्या नव्या लूकवरही आपले मत प्रदर्शित करत आहेत. अलीकडेच युवराजने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची शेवटची वेळ आठवली.

10 जुलै 2019 ला युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चंदीगडमध्ये जन्मलेल्या युवीला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. 2011 मध्ये टीम इंडियाला दुसरा विश्वचषक जिंकवून देण्यात युवराजने महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार मिळाला होता. युवीने आपल्या कारकीर्दीत 304 वनडे, 58 टी-20 आणि 40 कसोटी सामने खेळले आहेत.