युवराज सिंह (Photo Credits: Getty Images)

टीम इंडियाचे माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने काही महिन्यांपूर्वी निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. इंग्लंडमधील विश्वचषकात टीम इंडिया सातत्याने चांगली कामगिरी करत असताना युवराजने निवृत्तीची घोषणा केली. युवराजने आता असा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. भारतीय क्रिकेट संघाला (Indian Team) दुसरा विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या युवराजनेही स्वत: ला बाजूला सारण्याविषयीचे मोठे रहस्य उघडकीस केले. इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत युवराज याविषयी बोलताना म्हणाले, "त्या वेळी माझ्या मनात बर्‍याच गोष्टी चालू होत्या. मला वाटले की विश्वचषक सुरू झाला आहे आणि संघ पुढे गेला आहे. मला भारतासाठी क्रिकेट खेळायचे होते. पण माझे आयुष्य पुढे जात नव्हते." (6 षटकारांच्या 12 वर्षांनंतर युवराज सिंह याने काढली ऐतिहासिक मॅचची आठवण, शेअर केला 'हा' सुंदर Throwback Photo)

निवृत्तीबद्दल बोलताना युवराज म्हणाला की, तो आउट ऑफ चॉईस होता. विश्वचषकसाठी संघाची निवड झाल्याने मला देशाबाहेर जाऊन क्रिकेट खेळायचे होते. निवृत्ती कधी घ्यायचा याचा निर्णय घेणे तणावपूर्ण होत. माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा माझ्यासाठी ओझं बनलं होता, मी त्यातून कसे बाहेर पडायचे याचा विचार करत होतो. म्हणून मी विचार केला की निवृत्तीनंतर मला लीग खेळायचे असेल तर मला वाटले की ही योग्य वेळ आहे. कॅनडा लीगसाठी ही उपयुक्त वेळ होती. यापूर्वी मीआयपीएलमध्ये अर्धा खेळ खेळालाला नव्हता. मला वाटले की आता गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत, जेव्हा युवा खेळाडू संघाला पुढे नेतात आणि मी निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे."

2011 विश्वचषकचा नायक असलेला युवराज कर्करोगाने पुनरागमन केल्यानंतर कोणताही वनडे विश्वचषक (2015 आणि 2019) खेळू शकला नाही. युवराजने चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) 2017 मध्ये 300 वा वनडे सामना खेळला. विश्वचषक 2019 मध्ये न खेळण्याबाबत युवराज म्हणाला की, 2015 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन करूनही त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे, 2019 मध्ये खेळण्याची त्याची इच्छा होती. पण, तोवर तो 37 वर्षाचा झाला यामुळे बर्‍याच गोष्टी त्याच्या पक्षात नव्हत्या. आणि त्याला सपोर्टही नाही मिळाला. 2011 च्या विश्वचषकात युवराजने 9 सामन्यांच्या 8 डावांमध्ये 90.5 च्या प्रभावी सरासरीने 362 धावा केल्या आणि यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट 86.19 होता.