Yuvraj Singh | | Photo Credits: Archived images / Facebook)

Yuvraj Singh Car Collection: भारतीय क्रिकेट संघाचा अष्ठपैलू आणि तितकाच धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याला केवळ क्रिकेटच नव्हे तर वेगवेगळ्या कार खरेदी करण्याचीही भारीच हौस आहे. त्याच्याकडे विविध कंपन्यांच्या विविध कारचा संग्रह आहे. या संग्रहात आता आणखी एका कारची भर पडली आहे. युवराज सिंग याने नुकतीच BMW M5 ही कार खरेदी केली आहे. युवराजच्या संग्रहात नवी कार आली असली तरी अर्थातच ती नवी कोरी कार नाही. युवराज सिंग याने ही कार बिग बॉयज टॉयज (BBT)कडून घेतली आहे. BBT ही कंपनी सेकेंड हँड कारची विक्री करते. जाणून घेऊया या कारविषयी...

BMW M5 कंपनीची ही अत्यंत अलिशान आणि तितकीच लोकप्रिय सिडान कार 5 सीरीज चे हे व्हर्जन आहे. हे व्हर्जन कंपनीच्या 'M' विभागाकडून तयार करण्यात येते. युवराजने खरेदी केलेली ही कार निळ्या रंगाची आहे. या कारमध्ये कंपनीने 5.0 लीटर क्षमता असलेले V 10 हे इंजिन वापरले आहे. हे इंजिन 500 BHP ची शक्ती आणि 520 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

या कारमध्ये लॉन्च कंट्रोल सिस्टम, अॅडजेस्टेबल सस्पेंन्शन यांसारखे अत्याधुनिक आणि कितीतरी उत्कृष्ठ फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवय या कारमध्ये कंपनीने ६ स्पीड गियरबॉक्स, E 60 जनरेशन दिले आहे. सध्यास्थितीत या कंपनीचे जे BMW M5 हे मॉडेल बाजारात विक्रिसाठी आहे. त्यात 4395 cc क्षमता असलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. एका शोरुममध्ये कारच्या या मॉडेलची किंमत 1.44 कोटी इतकी सांगितली जात आहे. (हेही वाचा, सोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण)

कामगिरीबाबत बोलायचे तर ही कार अगदी जबरदस्त आहे. ही कार प्रतितास 250 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. युवराज सिंग याच्याकडे असलेल्या कारमध्ये लँम्बोर्गिनी, मर्सिलेगो, बेंटले कॉटिनेंटज फ्लाइंग स्पर, BMW X6 M, Audi Q5 आणि BMW 3 series यांसारख्या आलीशान गाड्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी युवराज सिंग आपल्या लॅंम्बोर्गिनी मर्सिलेगो सोबत बुद्ध इटरनॅशनल सर्किटवर पाहायला मिळाला होता. दरम्यान, युवराजच्या नव्या कारबाबत सध्या चर्चा आहे. मात्र, त्याने ही कार नेमकी किती रुपयांना खरेदी केली याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.