इरफान पठाण आणि युवराज सिंह (Photo Credit: Facebook)

माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि विश्वचषक विजेत्या फलंदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) ट्विटरवर एकमेकांना भिडले. इरफानने इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्सचे (Ben Stokes) कौतूक करताना मोठे भाष्य केले आहे. ‘भारतीय संघ जर त्यांच्याकडे स्टोक्स असेल तर जगात अपराजित राहिलं’, असे पठाणने म्हटले, पण पठाणचे म्हणणे युवराजला पटले नाही. एकट्या स्टोक्सने मॅन्चेस्टर येथील वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला. याचबरोबर संघाने मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध 1-1 बरोबरी साधली. फॉर्मेट कोणताही असो, परिस्थिती काहीही असो, इंग्लंडच्या क्रिकेट संघासाठी स्टॉक्सने नेहमीच सामना जिंकावणारे डाव खेळले आहेत. मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप फायनल आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत स्टोक्सने इंग्लंडकडून प्रभावी कामगिरी केली. इंग्लंडच्या अष्टपैलूच्या खेळीने प्रभावित झालेल्या पठाणने ट्विट केले की स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडू असल्यास भारतीय संघ अपराजित होईल. (ICC Test Rankings: आयसीसी अष्टपैलू रँकिंगमध्ये बेन स्टोक्स एक नंबरी, वेस्ट इंडिज कर्णधार जेसन होल्डरची दुसऱ्या स्थानी घसरण)

युवीला इरफानचे हे ट्विट विशेष आवडले नाही आणि वर्ल्ड कप विजेत्या ऑल-राउंडरने प्रतिक्रीया दिली. “तुला म्हणायचंय भारताकडे सामना जिंकावणारे अष्टपैलू खेळाडू नाहीत?,” असं ट्विट युवराजने केलं. युवीच्या ट्विटला प्रतिसाद देताना इरफानने म्हटले, "भावा, युवराज सिंह अधिकृतपणे निवृत्त झाला आहे..." दरम्यान, 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला युवराज 2011 भारताच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सामनावीर ठरला होता. खेळाच्या काळात भारतीय संघात दिलेल्या योगदानाबद्दल युवराजनेही इरफानचे कौतुक केले. गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या इरफानने काही प्रसंगी टीम इंडियामध्ये पहिल्या तीनमध्ये फलंदाजी केली.

पाहा युवराजच्या ट्विटवर इरफानची प्रतिक्रिया

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 सामन्यादरम्यान भारताचा पहिला पसंतीचा अष्टपैलू हार्दिक पंड्या अखेरचा सामना खेळला ज्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हार्दिकच्या मागील तक्रारीमुळे हार्दिक 2018 च्या मध्यापासून राष्ट्रीय संघाच्या आत-बाहेर होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबर 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध साऊथॅम्प्टन कसोटीपासून पांड्या कसोटी क्रिकेटही खेळला नाही. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियामध्ये 2018-19 बॉर्डर-गावस्कर मालिकेमधून मायदेशी परत जाण्यास भाग पाडले होते.