ICC Test Rankings: आयसीसी अष्टपैलू रँकिंगमध्ये बेन स्टोक्स एक नंबरी, वेस्ट इंडिज कर्णधार जेसन होल्डरची दुसऱ्या स्थानी घसरण
बेन स्टोक्स (Photo Credit: Getty)

ICC Test Rankings: इंग्लंड कसोटीचा उपकर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरला (Jason Holder) मागे टाकत आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मॅनचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडकडून (England) विजयी कामगिरीच्या आधारावर स्टोक्सने अव्वल स्थान मिळवले. अशा प्रकारे स्टोक्सने अव्वल स्थानी होल्डरचे 18-महिन्यांचे कार्यकाळ संपवले. स्टोक्सने मॅचेस्टरच्या पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा केल्या. इंग्लंडच्या विजयात स्टोक्सचा मोलाचा वाटा निभावला. त्याने 254 धावांसह 3 गडी बाद केले आणि इंग्लंडचा विजय निश्चित केला. इंग्लंडने विंडीजविरुद्ध 113 धावांनी विजय मिळवला आणि होल्डरच्या विंडीजविरुद्ध इंग्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Rankings) स्टोक्सने आता होल्डरवर 38 गुणांनी आघाडी मिळवली आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिजमधील मालिकेचा अंतिम सामना शुक्रवारी पुन्हा मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाईल. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा असेल. (ENG vs WI: बेन स्टोक्सच्या मधलं बोट दुमडलेल्या सेलिब्रेशनमागे आहे प्रेरणादायक कहाणी, जाणून तुम्हीही म्हणाल Wahh!)

दुसर्‍या कसोटीत बॅटने केलेल्या कामगिरीमुळे त्याला कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत तिसर्‍या स्थान मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन आणि स्टोक्स कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 827 गुणांसह एकत्रित तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलू खेळाडूंच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा स्टोक्स इंग्लंडचा पहिला खेळाडू आहे. इतकेच नव्हे तर त्याने फलंदाजीच्या बाबतीत डेविड वॉर्नर,अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केन विल्यमसन, बाबर आझम या फलंदाजांनाही पिछाडीवर टाकले.

मँचेस्टरमध्ये पहिल्या डावात 120 धावाच्या डावाने सलामी फलंदाज डॉम सिब्लीने 29 स्थानाची झेप घेत रँकिंगमध्ये 35 वे स्थान मिळवले, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत साऊथॅम्प्टनमध्ये चार स्थानांची झेप घेत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवत स्टुअर्ट ब्रॉडने कसोटीत पुनरागमन केले. पहिल्या कसोटी सामन्यात वगळलेल्या मँचेस्टर कसोटीच्या प्रत्येक डावात तीन गडी बाद करत ब्रॉड पहिल्या दहामध्ये परतला. होल्डरची गोलंदाजांच्या यादीतही घसरण झाली. विंडीज कर्णधार गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.