बेन स्टोक्स (Photo Credit: Getty)

गेल्या काही वर्षांत बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरला आहे. वनडे वर्ल्ड कप असो किंवा अ‍ॅशेस मालिका, स्टोक्सने आपल्या कामगिरीने इंग्लंड संघात (England Team) आपले स्थान निश्चित केले आहेत. संघाला दडपणाच्या परिस्थितीत फलंदाजीने बाहेर काढणे ते बॉलद्वारे महत्त्वपूर्ण गोलंदाजी करण्यापर्यंत सर्व काही तो करत आहे. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies) सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात स्टार अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत इंग्लंडकडून उठावदार कामगिरी करत आहे. शुक्रवारी दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी त्याने दहावा कसोटी तर इंग्लंडमध्ये पहिले कसोटी शतक झळकावले. त्याने 356 चेंडूत 176 धावा केल्या. जो रुटच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधारपद भूषविणारा स्टोक्स शतक साजरे करताना बोटाने वेगळे हावभाव करताना दिसला. शतक झळकावल्यानंतर स्टोक्सने आपलं मधलं बोट दुमडून हात उंचावत सेलिब्रेशन केलं. (ENG vs WI 2nd Test: बेन स्टोक्स याने टेस्ट सामन्यात टी-20 स्टाईलमध्ये असा मारला षटकार; खेळला 176 धावांचा विक्रमी डाव)

स्टोक्सच्या या अनोख्या उत्सवामागील एक प्रेरणादायक कहाणी आहे जी त्याचे वडिल जेड स्टोक्सशी (Ged Stokes) संबंधित आहे. बेन स्टोक्सचे वडील न्यूझीलंडचे माजी रग्बी खेळाडू जे आपल्या मुलासह रग्बी कोच म्हणून काम करण्यासाठी इंग्लंडला आले होते. जेड स्टोक्स यांना त्यांच्या व्यावसायिक रग्बी कारकीर्दीत असंख्य विघटना आणि इतर जखमांमुळे बोटाची एक समस्या निर्माण झाली होती. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला ज्यामुळे त्याला खेळापासून दूर राहणे आवश्यक होते. तथापि, गेडजेड स्टोक्सने यांनी खेळणे सुरू ठेवण्यासाठी त्यांचे बोट कापण्याची परवानगी दिली. आपल्याला इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांनी केलेल्या कष्टाचा सन्मान आणि आदर राखण्यासाठी बेन शतक झळकावल्यानंतर आपलं मधलं बोट दुमडतो.

दरम्यान, वर्ल्ड कप सामन्यानंतर बेन स्टोक्सच्या वडिलांचे स्वास्थ्य बिघडले आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची तब्येत पूर्ण झाली होती.