Close
Search
Close
Search

Yashasvi Jaiswal Record: यशस्वी जैस्वालचा धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावळे द्विशतक, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

पहिल्या दिवसाची हीरो, यशस्वी जैस्वालने खेळाच्या दुसऱ्या दिवशी आपला डाव 179 धावांनी वाढवला आणि द्विशतक झळकावून इतिहास रचला. त्याने 277 चेंडूत 200 धावांचा आकडा गाठला. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 7 षटकार मारले.

क्रिकेट Nitin Kurhe|
Yashasvi Jaiswal Record: यशस्वी जैस्वालचा धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावळे द्विशतक, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

IND vs ENG 2nd Test Day 2: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने 6 गडी गमावून 336 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाची हीरो, यशस्वी जैस्वालने खेळाच्या दुसऱ्या दिवशी आपला डाव 179 धावांनी वाढवला आणि द्विशतक झळकावून इतिहास रचला. त्याने 277 चेंडूत 200 धावांचा आकडा गाठला. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 7 षटकार मारले. (हे देखील वाचा: ICC U19 World Cup 2024: अंडर 19 विश्वचषकात भारताने दमदार शैलीत उपांत्य फेरीत मारली धडक, 'या' संघाशी होऊ शकते टक्कर)

अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला

भारतासाठी सुनील गावस्कर यांनी वयाच्या 21 वर्षे 227 दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले. तर विनोद कांबळी हे गावस्कर यांच्याही पुढे आहेत. कांबळीने वयाच्या 21 वर्षे 32 दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावले आहे. आता जयस्वालने दुहेरी शतक झळकावले असून वयाच्या 22 वर्षे 37 दिवसात त्याने ही कामगिरी केली आहे. भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

भारताकडून कसोटीत द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज

21 वर्षे 32 दिवस - विनोद कांबळी (1993)

21 वर्षे 277 दिवस - सुनील गावस्कर (1971)

22 वर्षे 37 दिवस - यशस्वी जैस्वाल (2023)*

डब्ल्यूटीसी मध्ये भारताकडून चौथे द्विशतक

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल हा चौथा खेळाडू ठरला आहे. यशस्वी जैस्वालच्या आधी मयंक अग्रवाल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये द्विशतके झळकावली होती. त्याचवेळी, टीम इंडियाच्या फलंदाजाने द्विशतक झळकावण्याची चार वर्षांनंतर ही पहिलीच वेळ आहे.

डब्ल्यूटीसी मध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणारे फलंदाज

215 - मयंक अग्रवाल

254* - विराट कोहली

212 - रोहित शर्मा

243 - मयंक अग्रवाल

208* - यशस्वी जैस्वाल

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change