Yashasvi Jaiswal (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही केली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 145/2