
WPL 2025 Harmanpreet Kaur vs Sophie Ecclestone Fight: मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर व युपी वॉरिअर्सची सोफी एक्लेस्टोन यांच्यामध्ये डब्ल्यूपीएलच्या सामन्यादरम्यान चांगलीच खडाजंगी झाल्याच पहायला मिळालं. गुरुवारी रात्री रंगलेल्या सामन्यात प्रकरण इतकं वाढलं की पंचांना मध्यस्थी करून दोघींना शांत करावं लागलं. या प्रकरणाची सुरूवात झाली युपी वॉरिअर्स प्रथम फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला. पंच अजितेश अरगळ यांनी षटकांची गती कमी झाल्यामुळे शेवटच्या षटकात फक्त 3 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी ठेवता येतील असे हरमनला सांगितले. Gujarat Giants Women Beat Delhi Capitals Women: रोमहर्षक सामन्यात गुजरातने दिल्लीचा केला पराभव, हरलीन देओलची 70 धावांची शानदार खेळी
हा निर्णय हरमनप्रीतला पटला नाही. तिने पंचांशी वाद घातला. त्यांच्या निर्णयावर नापसंती दर्शवली. दुसरी खेळाडू अमिलिया कर हिलाही हा निर्णय पटला नाही व तीही पंचांशी बोलायला लागली. या दरम्यान, नॉन स्ट्राइकर एंडला असलेल्या एक्लेस्टोनलाही यात पडली. तिनं मध्ये येणं हरमनप्रीतला रुचलं नाही व ती एक्लेस्टोनवर तुटून पडली. मग एक्लेस्टोननंही हरमनप्रीतवर तोंडसुख घेतलं.
— kuchnahi123@12345678 (@kuchnahi1269083) March 6, 2025
या दोघींमधली खडाजंगी हा प्रेक्षकांच्या करमणुकीचाच विषय ठरला. अखेर मुंबई इंडियन्सनं युपी वॉरिअर्सचा 6 बळी राखत पराभव केला. या विजयासह मुंबई इंंडियन्सनं गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं असून आत्तापर्यंत झालेल्या एकूण 6 सामन्यांमध्ये 4 विजय व 2 पराजयांची नोंद केली आहे.