WPL 2023 Schedule | (Photo credit: Twitter @BCCIWomen)

Women's Premier League Schedule In Marathi: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) अर्थात (BCCI) ने महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 चे वेळापत्र (WPL 2023 Schedule) जाहीर केले आहे. महिला प्रीमियर लीग लिलाव मुंबई पार पडल्यानंतर पुढच्या काहीच वेळात बीसीसीआयने हे वेळापत्रक (WPL 2023 Schedule In Marathi) जाहीर केले. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात 4 मार्च रोजी होईल. तर अंतिम सामना 26 मार्चला होईल. याचाच अर्थ ही प्रीमियर 4 मार्च ते 26 मार्च या काळात पार पडणार आहे.

महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणारे संघ:

  • मुंबई इंडियन्स (MI): Honor- Reliance Industries
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB): ऑनर- डियाजिओ
  • दिल्ली कॅपिटल्स (DC): Honor- JSW ग्रुप आणि GMR ग्रुप
  • गुजरात जायंट्स (GT): Honor- Adani Group
  • यूपी वॉरियर्स (UPW): Honor- Kapri Global

WPL पहिला डबल-हेडर 5 मार्चला होईल. त्या दिवशी ब्रेबोर्न स्टेडियममध्ये पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपीटल्स यांच्यात होईल. तर सायंकाळी डीवाय पाटिल स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात लढत होईल. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता सुरु होईल. साधारण 4 डबल हेडर होतील. सायंकाळी आणि रात्री पार पडणारे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरु होतील. (हेही वाचा, IND vs AUS 2nd Test 2023: दिल्लीत 36 वर्षांपासून टीम इंडियाचा आहे जबरदस्त रेकॉर्ड, आकडेवारी पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फुटेल घाम)

महिला प्रीमियर लीग संपूर्ण वेळापत्रक

4 मार्च GT विरुद्ध MI, संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम

5 मार्च RCB विरुद्ध DC दुपारी 3:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम

5 मार्च UPW विरुद्ध GG संध्याकाळी 7:30 PM, DY पाटील स्टेडियम

6 मार्च MI विरुद्ध RCB संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम

7 मार्च DC विरुद्ध UPW संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम

8 मार्च GG विरुद्ध RCB, संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम

9 मार्च DC विरुद्ध MI 7: संध्याकाळी 7:30- पाटील स्टेडियम

10 मार्च RCB विरुद्ध UPW: संध्याकाळी 7:30- ब्रेबॉर्न स्टेडियम

11 मार्च GG विरुद्ध DC: संध्याकाळी 7:30- DY पाटील स्टेडियम

12 मार्च UPW विरुद्ध MI: संध्याकाळी 7:30- ब्रेबॉर्न स्टेडियम

13 मार्च DC विरुद्ध RCB : संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम

14 मार्च MI विरुद्ध GG: संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम

15 मार्च UPW विरुद्ध RCB: संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम

16 मार्च DC vs GG: संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम

18 मार्च MI vs UPW: दुपारी 3:30 , DY पाटील स्टेडियम

18 मार्च RCB vs GG : संध्याकाळी 7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम

20 मार्च GG वि UPW: दुपारी 3:30 वाजता, ब्रेबॉर्न स्टेडियम

20 मार्च MI vs DC: संध्याकाळी 7:30 , DY पाटील स्टेडियम

21 मार्च RCB vs MI: दुपारी 3:30 PM, DY पाटील स्टेडियम

21 मार्च UPW vs DC: संध्याकाळी 7.30 , ब्रेबॉर्न स्टेडियम

24 मार्च एलिमिनेटर: संध्याकाळी 7:30, डीवाय पाटील स्टेडियम

26 मार्च, अंतिम सामना: संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबॉर्न स्टेडियम

ट्विट

दरम्यान, मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडीयम आणि ब्रेबोर्न स्टेडियममध्ये एकसारखे 11-11 सामने होतील. दरम्यान, लीगच्या शेवटच्या काही टप्प्यांमध्ये यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपीटल्स यांच्यात 21 मार्चला ब्रेबोर्न स्टेडियमध्ये लढत होईल. तर दुसऱ्या बाजूला एलिमिनेटरल सामना 24 मार्च रोजी डीवाय पाटिल स्टेडीयमवर खेळला जाईल. लीगचा अंदिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबोर्न स्टेडीयमवर आयोजित केला जाईल.