केन विल्यमसन आणि हेन्री नोकोल्स (Photo Credit: PTI)

World Test Championship Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात 18 जून ते 22 जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या एजस बाउल स्टेडियमवर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) उदघाटन आवृत्तीचा अंतिम सामना रंगणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यापूर्वी भारत व किवी संघाची घोषणा झाली आहे. अंतिम सामन्यासाठी कीवी संघाची कमान स्टार फलंदाज केन विल्यमसनच्या (Kane Williamson) हाती देण्यात आली आहे. न्यूझीलंडने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली असल्यामुळे टीम इंडियाविरुद्ध (Team India) होणाऱ्या अंतिम चॅम्पियनशिप फायनलमध्ये किवी टीम आपल्या ज्या खतरनाक 11 खेळाडूंना मैदानात उतरवू शकते त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. (ICC World Test Championship Final 2021: न्यूझीलंड विरोधात WTC फायनल सामन्यात टीम इंडिया ‘या’ 11 धुरंधरांना मैदानात उतरवणार, पहा संभावित प्लेइंग XI)

सलामी जोडी: भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट स्पर्धेच्या फायनल सामन्यात किवी संघासाठी टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेल सलामीला उतरू शकतात.  लॅथमने किवी संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 56 सामन्यात 42.2 च्या सरासरीने 3929 धावा केल्या तरब्लंडेलने 10 सामने खेळले असून 38.4 च्या सरासरीने 538 धावा केल्या. यादरम्यान ब्लंडेलने दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत.

मध्यम क्रम: अंतिम सामन्यात मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार केन विल्यमसनसह रॉस टेलर, हेन्री निकोल्स आणि विकेटकीपर बी. जे वॉटलिंगच्या खांद्यावर असेल. दुखापती पूर्वी कर्णधार विल्यमसन बॅटने शानदार फॉर्ममध्ये होता. विल्यमसनने टेस्ट चॅम्पियनशिपच्या 9 सामन्यात एकूण 817 धावा केल्या आहेत. संघाकडून तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे, संघ त्याच्यावर कर्णधार आणि मधल्या फळीत फलंदाज म्हणून अधिक अवलंबून असेल.

गोलंदाजी क्रम: किवी संघ आपल्या चार खतरनाक वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतो. यामध्ये ट्रेंट बोल्ट, टीम साउथी, काईल जेमीसन आणि नील वॅग्नरचा समावेश आहे. भारताच्या किवी दौऱ्यावर जेमीसन सोबत अन्य तीन अनुभवी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत पाडले होते. याशिवाय मिचेल सॅटनरचा संघात तज्ज्ञ फिरकीपटू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. गोलंदाजीने तसेच बॅटने सॅटनर संघात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.

पहा न्यूझीलंडची WTC फायनलसाठी संभावित प्लेइंग XI

केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॅटलिंग (विकेटकीपर), मिचेल सॅटनर, काईल जेमीसन, ट्रेंट बोल्ट, टीम साउथी आणि नील वॅग्नर.