ICC World Test Championship Final 2021: न्यूझीलंड विरोधात WTC फायनल सामन्यात टीम इंडिया ‘या’ 11 धुरंधरांना मैदानात उतरवणार, पहा संभावित प्लेइंग XI
केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाविरुद्ध 18 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून आता अंतिम 11 मध्ये कोणत्या धुरंधरांना संधी मिळते याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. साऊथॅम्प्टनच्या मैदानावर टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरते याबद्दल आज आपण पाहणार आहोत.
India’s Predicted XI For WTC 2021 Final: केन विल्यमसनच्या न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध 18 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा झाली असून आता अंतिम 11 मध्ये कोणत्या धुरंधरांना संधी मिळते याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. साऊथॅम्प्टनच्या एजस बाउल येथे न्यूझीलंड-भारत संघात कसोटी क्रिकेटच्या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल दरम्यान टीम इंडिया (Team India) निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट संघ होता. टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडकर्त्यांनी निवडलेली नावं अपेक्षित होतीच. त्यामुळे, साऊथॅम्प्टनच्या (Southampton) मैदानावर टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरते याबद्दल आज आपण पाहणार आहोत. (उत्तम कामगिरीनंतरही Prithvi Shaw ला भारतीय संघात का जागा मिळाली नाही? बीसीसीआयने सांगितले कारण)
सलामी जोडी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वी शॉच्या अपयशानंतर शुभमन गिलला संधी मिळाली ज्याने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. युवा सलामी फलंदाजाने अनुभवी रोहित शर्मासोबत चांगली सलामी भागीदारी करत संघाला आवश्यक अशी सुरुवात करून दिली. त्यामुळे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात टीम इंडिया शुभमन-रोहितच्या सलामी जोडीला मैदानात उतरवू शकते. नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात गिलची ढासळलेली कामगिरी कायम राहिली आणि मयंक अगरवाल एक उपयुक्त पर्याय सिद्ध होत असला तरी संघ व्यवस्थापन युवा सलामी फलंदाजा सोबत टिकून राहतील.
माध्यम क्रम: टीम इंडियाच्या मधल्या फळीत कोणताही बदल होताना दिसत नाही. कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानावर आपले कौशल दाखवेल तर कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानावर उतरेल. उपकर्णधार अजिंक्य रहाणे पाचव्या आणि युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत मधल्या फळीत फटकेबाजी करणाऱ्या फिनिशरची भूमिका बजावेल.
अष्टपैलू: रवींद्र जडेजा दुखापतीनंतर संघात कमबॅक करेल. मागील काही वर्षात जडेजा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून उदयास आला आहे. जडेजा संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू असेल तर रविचंद्रन अश्विनच्या रूपात त्याला खालच्या फळीत उपयुक्त जोडीदार मिळेल. अश्विन यापूर्वी ऑस्ट्रेलिया व अखेरीस इंग्लंड विरोधात बॅटने प्रभावी ठरला होता.
गोलंदाज: भारताकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आजवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इशांत शर्मा व मोहम्मद शमीची जागा निश्चित दिसत आहे. पण, शमीचा इंग्लंडमधील रेकॉर्ड खराब असल्याने आणि मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत असल्यामुळे संघ व्यवस्थापन महत्त्वाच्या अंतिम फेरीत सिराजला स्थान देऊ शकते. शिवाय, चॅम्पियन जसप्रीत बुमराहशिवाय कोणताही भारतीय वेगवान हल्ला कधीच पूर्ण होऊ शकत नाही. 17 डावात 34 विकेट्स घेत बुमराह भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. बुमराहने साऊथॅम्प्टनमध्ये मागील सामन्यात चार विकेट्स मिळवले आणि भारतीय संघ व चाहत्यांना त्याच्याकडून पुन्हा एकदा आक्रमक कामगिरी अपेक्षित असेल.
भारताचा WTC फायनल संभावित प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2021 10:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

