यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (ICC World Test Championship Final) बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली. यासह इंग्लंडविरुद्धच्या खेळण्यात येणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीदेखील कसोटी संघाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, निवड समितीने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर, आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) कसोटी संघात आपले स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरला आहे. पृथ्वी शॉ अनफिट असून त्याला वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने शॉला वजन कमी करण्यास सांगितले आहे, त्यानंतरच त्याचे संघात निवड केली जाईल. पृथ्वी शॉ 21 वर्षाचा असतानाही इतर खेळाडुंच्या तुलनेत स्लो आहे. यामुळे त्याला काही किलो वजन कमी करण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धही फिल्डिंग करत असताना त्याला वजनामुळे खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नव्हते. ऑस्ट्रेलियातून आल्यानंतर पृथ्वी शॉ खूप मेहनत घेत आहे, असे बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले आहे. हे देखील वाचा- ICC World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या Test Team ची घोषणा
भारतीय संघ-
ICYMI - A look at #TeamIndia's squad for the inaugural ICC World Test Championship (WTC) final and the five-match Test series against England. 👇
Standby players: Abhimanyu Easwaran, Prasidh Krishna, Avesh Khan, Arzan Nagwaswalla pic.twitter.com/17J050QVT3
— BCCI (@BCCI) May 7, 2021
आयपीएल 2020 मध्ये खराब प्रदर्शन करणाऱ्या ऋषभ पंतलाही बीसीसीआयने वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की शॉला आणखी काही स्पर्धांमध्येही आपला शानदार फॉर्म सुरू ठेवावा लागेल. शॉ हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याला जास्त काळ भारतीय संघापासून दूर ठेवता येणार नाही. दिल्ली कॅपिटलकडून खेळत शॉने 8 सामन्यांत 308 धावा केल्या होत्या. तसेच त्यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये 800 च्या वर धावा केल्या होत्या.