ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) 2020 च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविणारा भारतीय संघ (Indian Team) आज या स्पर्धेतील शेवटच्या लीग सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) सामना करीत आहे. भारत-श्रीलंकामध्ये मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर महिला टी-20 वर्ल्ड कपचा 14 वा लीग सामना खेळला जात आहे. भारताचा हा अखेरचा लीग सामना आहे. त्यांनी यापूर्वीच सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंका संघ मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरला. त्यांनी निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट 113 गमावून धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा जोरदार खेळ केला आणि श्रीलंकेला 113 धावांपर्यंत रोखले. भारताकडून राधा यादवने (Radha Yadav) सर्वाधिक 4, राजेश्वरी गायकवाड 2 आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ने 1 गडी बाद केला. भारताने सुरुवातीपासून श्रीलंका महिला संघावर वर्चस्व कायम ठेवले होते. (INDW vs SLW, Women's T20 World Cup Live Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका महिला टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर)
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दीप्तीने श्रीलंकेच्या संघाला पहिला धक्का दिला. दीप्तीने उमेशा थिमासिनीला राजेश्वरीकडे 2 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर हर्षिता माधवी 12 धावांवर बाद झाली. राधाने विरोधी संघाची कर्णधार चमारी अट्टापट्टू 33 धावांवर पॅव्हिलिअनकडे पाठवले. श्रीलंकेकडून अट्टापट्टूने सर्वाधिक धावा केल्या. शशिकला श्रीवर्धने 13 धावांचे योगदान दिले. हर्षिता माधवी 12, कविशा दिलहरीने 25 धावा केल्या. श्रीलंकेचे 7 फलंदाज दाहीचा आकडाही पार करू शकले नाही.
भारतीय संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या हरमनप्रीत कौरच्या संघाने आजवर स्पर्धेत सर्व सामने जिंकले आणि विजयीची हॅटट्रिक केली आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून पुढील दोन सामन्यात बांग्लादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला. या तीनही सामन्यांत भारताच्या गोलंदाजीने प्रभावित केले. श्रीलंकाविरुद्ध भारतीय महिला संघ विजयाची चौकार मारण्याचा प्रयत्न करत आहे.