भारत महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Getty Images)

भारतीय महिला संघाने (India Women's Team) हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात ऑस्ट्रेलिया येथे सुरु आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (ICC Women's T20 World Cup) उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात यजमान आणि चार वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी आणि त्यानंतर बांग्लादेशविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध सामना रोमांचक ठरला, अखेरपर्यंत कोणता संघ जिंकेल याची स्पष्टता नसताना अखेरीस भारताने 4 विकेटने सामना जिंकत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. आता विजयाचा चौकार मारण्याच्या हेतूने भारत श्रीलंका महिला टीम (Sri Lanka Women's Team) विरुद्ध मैदानात उतरेल. भारताचा अग्रुप मधील अखेरचा सामना असेल. दोन पराभवांसह श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. परंतु भारतीय संघासाठी काही विभाग चिंतेचे विषय बनले आहेत आणि पुढील कठीण सामन्यांपूर्वी तो त्याच्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करेल. (Women's T20 World Cup 2020: न्यूझीलंडविरुद्ध तुफान फलंदाजी करणाऱ्या भारताच्या 16 वर्षीय शेफाली वर्मा ने रचला इतिहास, स्ट्राइक रेटमध्ये सर्वांवर केली मात)

आयसीसी महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेत भारत-श्रीलंका सामना 29 फेब्रुवारी, शनिवारी होईल. मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल येथे सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल. भारतात सकाळी 9 वाजल्यापासून सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. हा सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार ऑनलाईन पहिले जाऊ शकते.

सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केल्यावर भारतीय महिला संघ श्रीलंकेविरूद्ध अंतिम लीग सामन्यात फलंदाजीतील उणीवा दूर करू पाहत असेल. पहिल्या तीन सामन्यात भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी आले होते. ऑस्ट्रेलियाविरुध्द 132, बांग्लादेशविरुद्ध 142 आणि न्यूझीलंडविरूद्ध 133 धावा केल्या होत्या. भारतीय मधल्या फळीत कोणतीही फलंदाज सामन्यात चांगली सुरुवात करण्याचा फायदा होऊ शकली नाही आणि संघ केवळ कमी धावा करू शकला. सलामी फलंदाज स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीतने अजूनही मोठा डाव खेळलेला नाही. दुसरीकडे, शेफाली वर्माने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये 114 धावा केल्या आहेत पण त्यात अर्धशतकांचा समावेश नाही. तिलाही चांगल्या सुरुवातीला मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतरित करणे देखील आवश्यक आहे.

पाहा भारत-श्रीलंका महिला संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), तानिया भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड़, ऋचा घोष, वेदा कृष्णमूर्ति, स्मृति मंधाना, शिखा पांडे, पूनम यादव, अरुंधति रेड्डी, जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव.

श्रीलंका: हसीनी परेरा, चमारी अट्टापट्टू (कॅप्टन),  उमेश थिमाशिनी, अनुष्का संजीवनी (w), नीलाक्षी डी सिल्वा, अमा कंचना, शशिकला श्रीवर्धने, हर्षिता माधवी, कविता दिलहरी, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी, दिलानी मनोदरा, हंसिमा करुणारत्ने, अचनी कुलसुरीया, सत्य संदीपनी.