Women's T20 World Cup 2020: टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल फेरीत, न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत करून केली पूर्ण विजयाची हॅटट्रिक
भारतीय महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Twitter/ICC)

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये आज भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) महिला टीममध्ये टी-20 वर्ल्ड कपचा 9 वा सामना खेळला गेला. आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करत भारताला 4 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने विश्वचषकच्या सेमीफायनल फेरीत स्थान निश्चित केले आहे. भारताने ग्रुप फेरीतील खेळल्या तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवाल आणि त्यांनी 6 गुणांसह 5 देशांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताने न्यूझीलंडला 134 धावांचे लक्ष्य दिले होते. याच्या प्रत्युत्तरात किवी टीमला 5 विकेट गमावून 129 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून शीख पांडे, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रथम फलंदाजी करत भारताने शेफाली वर्माच्या (Shafali Verma) 46 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर 8 विकेट गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 133 धावा केल्या. (Women's T20 World Cup: स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर ने केले निराश; भारत महिला टीमने न्यूझीलंडला दिले 134 धावांचे लक्ष्य)

134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड महिला संघाला दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. रेचल प्रीस्‍ट 12 धावांवर शीख पांडेच्या गोलंदाजीवर राधा यादवकडे कॅच आऊट झाली. त्यानंतर सुझी बेट्स 6 धावांवर दीप्तीने बोल्ड केले. भारतीय गोलंदाजांपुढे न्यूझीलंड महिला निरुत्तर राहिल्या. न्यूझीलंड टीमने क्षेत्ररक्षणात सुस्ती दाखवली आणि जोरदार फलंदाजी करणाऱ्या भारताच्या शेफालीला तब्बल तीन वेळा जीवदान दिले.

दरम्यान, आजवर टीम इंडिया दोन्ही सामन्यात अजिंक्य संघ आहे. त्यांनी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्यांनी आता ग्रुप अ मध्ये सर्व सामन्यात विजय मिळवत 6 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आता या ग्रुपमधील दुसऱ्या टीमसाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये लढत पाहायला मिळेल. भारताचा दुसरा सामना 29 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेशी होईल.