Women's T20 Challenge 2020 Final: महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम (Women's T20 Challenge Final) सामना सुपरनोव्हास (Supernovas) आणि ट्रेलब्लेझर (Trailblazers) यांच्यात नुकताच पार पडला. ट्रेलब्लेझरने पहिले फलंदाजी करत 118 धावा केल्या ज्याच्या प्रत्युत्तरात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) सुपरनोव्हासला 111 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ट्रेलब्लेझरने 16 धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) झालेल्या स्पर्धेत ट्रेलब्लेझर पहिल्यांदा स्पर्धेचे चॅम्पियन बनले. हरमनप्रीतच्या संघाने यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये विजेतेपद जिंकले होते. पण, ट्रेलब्लेझरने यंदा विजयाची हॅटट्रिक करण्याचे स्वप्न भंग झाले. ट्रेलब्लेझरच्या विजेतेपदाच्या विजयात आज गोलंदाजांनी महतवाची भूमिका बजावली. छोट्या लक्ष्याचा बचाव करताना गोलंदाजांनी संघाला उपयुक्त सुरुवात करून दिली आणि सुपरनोव्हास फलंदाजांवर सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले. ट्रेलब्लेझरसाठी सलमा खातूनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर दीप्ती शर्माने 2 तर आणि सोफी एक्लस्टोन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, सुपरनोव्हाससाठी कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक 30 धावा केल्या. शशिकला सिरीवर्डेन 19 धावा केल्या, तानिया भाटियाने 14 आणि जेमीमाह रॉड्रिग्जने 13 धावा केल्या. (Women's T20 Challenge 2020 Final: राधा यादवच्या अचूक माऱ्यासमोर Trailblazers ने टेकले गुडघे; Supernovas समोर 119 धावांचं आव्हान)
सुपरनोव्हाससाठी यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारी चमारी आटपट्टूला आजच्या सामन्यात फक्त 6 धावाच करता आल्या. दीप्ती शर्माने तानिया भाटियाला स्वस्तात माघारी धाडलं आणि संघाला दुसरे यश मिळवून दिल. त्यांनतर यंदाच्या हंगामात पहिल्यांदा सलामीला आलेल्या जेमीमाह रॉड्रिग्जने देखील निराश केले. तिने एक चौकार मारत 13 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत एकाबाजूने लढा देत राहिली. तिला पहिले सिरीवर्डेनची साथ मिळाली. सलाम खातूनने सिरीवर्डेनला माघारी धाडलं आणि सामन्यात रोमांच बनून राहिला. पण, अखेरच्या क्षणी सलमा खातूनने एका ओव्हरमध्ये दोन विकेट घेत सामन्याचे चित्रच बदलले. खातूनने मोक्याच्या क्षणी सुपरनोव्हास कर्णधार हरमनप्रीतची मोठी विकेट मिळवली.
#Trailblazers WIN the #JioWomensT20Challenge pic.twitter.com/LXJClXZcn3
— IndianPremierLeague (@IPL) November 9, 2020
दरम्यान, यापूर्वी आजच्या सामन्यात ट्रेलब्लेझरने पहिले फलंदाजी केली. संघासाठी स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा केल्या, पण कर्णधारची विकेट पडल्यावर त्यांचा डाव गडगडला आणि त्यांना फक्त 118 अशा सन्मानजनक धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. स्मृतीने सर्वाधिक 68 धावा केल्या. डिएंड्रा डॉटिनने 20 धावा केल्या. दुसरीकडे, सुपरनोव्हाससाठी राधा यादवने (Radha Yadav) सर्वाधिक 5 तर पूनम यादव आणि शशिकला सिरीवर्डेन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.