Women's T20 Challenge 2020: महिला टी-20 चॅलेंजच्या (Women's T20 Challenge) आजच्या निर्णायक सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासने (Supernovas) स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझरचा (Trailblazers) फक्त 2 धावाने केला आणि तिसऱ्यानंद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. आजच्या सामन्यात सुपरनोव्हासने पहिले फलंदाजी करत ट्रेलब्लेझरला 147 धावांचे लक्ष्य दिले होते ज्याच्या प्रत्युत्तरात मंधानाच्या टीमला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 143 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि पराभव पत्करावा लागला. दरम्यान, आजच्या सामन्यात पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाच्या टीमने फायनलमध्ये स्थान निश्चित केलं असून आता त्यांचा विजेतेपदासाठी सामना पुन्हा एकदा सुपरनोव्हासशी होईल. सुपरनोव्हासने यापूर्वी दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. यासह मिताली राजच्या वेलॉसिटीचं (Velocity) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहेत. सुपरनोव्हासने पॉसिटीव्ह नेट रनरेटच्या आधारावर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. (Women's T20 Challenge 2020: चमारी अटापट्टूचे धडाकेबाज अर्धशतक, हरमनप्रीत कौरची फटकेबाजी; सुपरनोव्हासचे ट्रेलब्लेझरला विजयासाठी 147 धावांचं तगडं आव्हान)
दरम्यान, आजच्या सामन्यात साठी कर्णधार स्मृतीने 33 तर डिएंड्रा डॉटिनने 27 धावा केल्या. दीप्ती शर्माने नाबाद 43 धावा आणि हर्लीन देओलने 27 धावांचे योगदान दिले. रिचा घोष आणि दायलन हेमलता यांनी प्रत्येकी 4 धावा केल्या. सुपरनोव्हाससाठी आजच्या सामन्यात शकेरा सेलम आणि राधा यादव यांनी सर्वाधिक 2 तर अनुजा पाटीलला 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या सुपरनोव्हाससाठी सलामी फलंदाज चमारी अटापट्टूने पुन्हा एकदा संघाला शानदार सुरुवात करून दिली आणि 67 धावांचा डाव खेळत संघाला आव्हानात्मक धावसंख्येकडे नेले. अटापट्टू वगळता कर्णधार हरमनप्रीत कौरने 31 आणि प्रिया पुनियाने 30 धावा केल्या. अटापट्टूने 47 चेंडूत 67 धावा केल्या आणि प्रिया पूनियाबरोबर पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. तर ट्रेलब्लेझरसाठी सलमा खातून, झुलन गोस्वामी आणि हर्लीन देओल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
दरम्यान, सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर यांच्यात 9 नोव्हेंबर रोजी फायनल सामना खेळला जाईल. हरमनप्रीतच्या संघाचे लक्ष्य सलग तिसऱ्या विजेतेपदावर असेल तर स्मृतीचा संघ पहिल्या विजेतेपदासाठी मैदानावर उतरेल.