रमीज राजा (Photo Credit: Twitter)

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) पाकिस्तानची (Pakistan) अविश्वसनीय मोहीम देशातील खेळाला मोठी चालना देणारी ठरली आहे. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी 2022 मध्ये होणार्‍या पाकिस्तानचा द्विपक्षीय दौरा जाहीर केला आहे. यामुळे पाकिस्तान बोर्ड देशात क्रिकेटच्या वाढीस मदत करण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ पाहत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raj) यांनी पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) विस्ताराची योजना अंडर-19 आणि महिला टूर्नामेंटबाबत योजना जाहीर केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “ऑक्टोबरमध्ये आशा करतो की आम्ही अंडर-19 स्तरावरील क्रिकेटसाठी काहीतरी पीएसएल (PSL) सुरू करू. आम्ही खूप उत्साहित आहोत कारण असे जगात कुठेही घडलेले नाही. इंग्लंड त्यांचे अंडर-19 खेळाडू पाठवेल, आम्ही त्यांची काळजी घेऊ. आम्ही एक नवीन मालमत्ता तयार करू.” (T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल लढतीपूर्वी PCB ने बाबर आजम आणि संघाला दिला खास संदेश, पहा Video)

“महिला PSL देखील माझ्या मनात आहे. आशा आहे की, आम्ही ही लीग सुरू करणारे आशियातील पहिले क्रिकेट बोर्ड बनू,” राजा पुढे म्हणाले. ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग (BBL) आणि इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ महिला स्पर्धा सुरू असताना, आशियातील कोणत्याही देशात सध्या महिला फ्रँचायझी स्पर्धा आयोजित केली जात नाही. महिला पीएसएलमध्ये ही कामगिरी करणारा पाकिस्तान हा पहिला आशियाई देश व्हावा, अशी इच्छा राजा यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय पीसीबी अध्यक्षांनी देशाच्या दौऱ्यावर सहमती दिल्याबद्दल इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचेही आभार मानले. 24 वर्षांतील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा असेल तर यंदा वर्षाच्या सुरुवातीला दौऱ्यातून माघार घेणाऱ्या इंग्लंडने या पराभवाची भरपाई करण्यासाठी आणखी दोन सामने मालिकेत जोडले आहेत. राजा म्हणाले, “इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरे हे खूप मोठे यश आहे आणि मला आमच्या संघाकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. आम्ही एक अभिमानास्पद राष्ट्र व्हावे आणि आमचे चाहते, संघ आणि बोर्ड यांचा आदर केला जावा अशी माझी इच्छा आहे.”

दरम्यान, गुरुवारी टी-20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेनांतर डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजचा पाहुणचार करण्यापूर्वी ते या महिन्याखेरीस बांगलादेशविरुद्ध दौऱ्यावर जाणार आहेत.