WPL 2023: महिला प्रीमियर लीगला शनिवारपासुन होणार सुरुवात, ईथे पहा सर्व 5 संघांचे कर्णधार आणि संपूर्ण खेळाडू
WPL

भारतात, ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग (WPL 2023) म्हणजेच पुरुष क्रिकेटच्या आयपीएलप्रमाणे 4 मार्चपासून महिला टी-20 लीग सुरू होत आहे. आतापासून अवघ्या काही तासांनी, आयपीएलप्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्ये महिला धमाल करताना दिसतील तेव्हा धूमधडाका सुरू होईल. पहिल्या सत्रात पाच संघ सहभागी होत आहेत. सर्व संघ प्रत्येक संघासोबत दोन साखळी सामने खेळतील. संपूर्ण हंगाम मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेचा पहिला सामना शनिवारी गुजरात विरुद्ध मुंबईमध्ये (GT vs MI) होणार आहे. तर अंतिम सामना 26 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

जर आपण स्पर्धेच्या स्वरूपाबद्दल बोललो तर प्रत्येक संघ 8-8 लीग सामने खेळेल. म्हणजे प्रत्येक संघाला प्रत्येक संघासोबत खेळावे लागेल आणि प्रत्येक संघाला प्रत्येक संघाविरुद्ध 2-2 सामने खेळावे लागतील. जेव्हा सर्व संघ 8-8 सामने खेळतील, तेव्हा गुणतालिकेतील अव्वल संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. (हे देखील वाचा: WPL 2023 Opening Ceremony: महिला प्रीमियर लीगमध्ये लागणार बाॅलिवूड तडका, क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी लावणार ठुमके)

पहा संपूर्ण संघ

दिल्ली कॅपिटल्स: जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजन कॅप, टायटस साधू, अॅलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिनू मणी, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया, पूनम यादव , जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती आणि अपर्णा मंडल.

आरसीबी: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (विकेटकीपर), एरिन बर्न्स, दिशा कसाट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, आशा शोभना, श्रेयंका पाटील, हीदर नाइट, डेन वॅन निकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल जंजाड, मेगन शट आणि सहाना पवार.

मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा खाजी, प्रियांका बाला, सोमा, जिंतामणी कलिता, नीलम बिष्ट.

यूपी वॉरियर्स: दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, देविका वैद्य, ताहलिया मॅकग्रा, शबनीम इस्माईल, ग्रेस हॅरिस, अलिसा हिली (कर्णधार), अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता शेरावत, किरॉन नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, शेखर चोप्रा, लक्ष्मी यादव, एस. यशसरी.

गुजरात दिग्गज: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा, अॅशले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डायंड्रा डॉटिन, सबिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबमन शकील.