West Indies-Pakistan Women's T20I (Photo Credit: Twitter)

West Indies-Pakistan Women's T20I: वेस्ट इंडीज महिला आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सामना सुरु असताना वेस्ट इंडीज संघातील 2 खेळाडू मैदानातच बेशुद्ध झाले आहेत. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या दोन्ही खेळाडूं अचानक बेशुद्ध का झाले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या दोघांवरही उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरु होता. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडू शिनेल हेनरी आणि चिडेन नेशन फिल्डिंग करत असताना अचानक बेशुद्ध पडल्या. पहिल्यांदा हेनरी जमीनीवर पडल्यानंतर दहा मिनिटांनी नेशनही बेशुद्ध झाली. त्यावेळी त्यांची प्रकृती इतकी वाईट होती की त्याला एका स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले होते. हे देखील वाचा- India vs Sri Lanka: क्‍वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघाची मौज-मस्ती; पहा त्यांच्या Fun Activities चा व्हिडीओ

व्हिडिओ-

व्हिडिओ-

या घटनेनंतर काही वेळ थांबवण्यात आलेला सामना पुन्हा सुरु करण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजच्या संघाने 125 धावा ठोकल्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघ 18 षटकांत 6 विकेट्स गमावून 103 धावा करू शकला. दरम्यान, मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीनंतर या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईसच्या नियमांतर्गत जाहीर करण्यात आला. ज्यामुळे वेस्ट इंडीजच्या संघाचा सात धावांनी विजय मिळवता आला आहे.