West Indies Women Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team 2nd Semi Final Match: सध्या यूएई मध्ये महिला टी-20 विश्वचषक 2024 सुरु आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दुसरा उपांत्य सामना 18 ऑक्टोबरला म्हणजेच आज होणार आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे संघ (West Indies Women Cricket Team vs New Zealand Women) आमनेसामने असतील. हा सामना दोन्ही संघांसाठी खास आहे, कारण जो जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाचा प्रवास इथेच संपेल. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आकडेवारीत न्यूझीलंड वरचढ (WI vs NZ W Head to Head)
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 23 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा होता. न्यूझीलंडने 17 सामने जिंकले, तर वेस्ट इंडिजने 5 सामने जिंकले. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
All ready for Semi-Final 2 👀
Who will join South Africa in the #T20WorldCup Final? 🏆#WIvNZ preview 📲 https://t.co/He4Kc1Xz8x#WhateverItTakes pic.twitter.com/sbwXu4eVp5
— ICC (@ICC) October 18, 2024
दुसऱ्या उपांत्य फेरीतील प्रमुख खेळाडू (WI W vs NZ W Key Players)
हेली मॅथ्यूज, कियाना जोसेफ, एफी फ्लेचर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन, ली ताहुहू हे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग कसा बदलायचा हे माहित आहे. सर्वांच्या नजरा खेळांडूवर असतील.
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (Mini Battle)
न्यूझीलंडची महिला स्टार बॅट्समन सोफी डिव्हाईन विरुद्ध वेस्ट इंडिजचा गोलंदाज एफी फ्लेचर यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. त्याचवेळी हीली मॅथ्यू विरुद्ध ली ताहुहू यांच्यातील संघर्षाचाही या सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये अनेक प्रभावी युवा खेळाडूंसह संतुलित फळी आहे. (हे देखील वाचा: WI W vs NZ W, 2nd Semi Final Live Streaming: आज वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा उपांत्यफेरी सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
कधी अन् कुठे खेळवला जाणार सामना?
न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडीज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा उपांत्य सामना 18 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
तुम्हाला या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पहायचे असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच मोबाईलमध्ये Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेवू शकता.
दोन्ही देशाची संभाव्य प्लेइंग 11
वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यू (कर्णधार), कियाना जोसेफ, शमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आलिया ॲलेने, आफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.
न्यूझीलंड: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.