
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: आयपीएल 2025 (IPL 2025) सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) येथे होणार आहे. सनरायझर्स हैदराबादने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, लखनौ संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. दरम्यान, हैदराबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व जाणून घेवूया...
फलंदाजांना मिळू शकते मदत
हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे कारण खेळपट्टी पूर्णपणे सपाट आहे. येथे फलंदाज खूप धावा काढतात. पण खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकीपटूंना काही मदत मिळू शकेल. आतापर्यंत, हैदराबादमध्ये एलएसजी आणि एसआरएच यांच्यात दोन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक जिंकला आहे. (हे देखील वाचा: SRH vs LSG IPL 2025 7th Match Live Streaming: आज हैदराबाद आणि लखनौमध्ये होणार रोमांचक सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह)
टॉसची भूमिका असणार महत्त्वाची
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 78 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 43 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. तर 35 मध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. अशा परिस्थितीत, LSG आणि SRH यांच्यातील सामन्यात जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेईल.
दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडू
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील शेवटचा सामना याच मैदानावर खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत 286 धावा केल्या होत्या. तेव्हा इशान किशनने शतक ठोकले होते. तर ट्रॅव्हिस हेडने एक दमदार खेळी केली. हैदराबादकडे अभिषेक शर्मा, नितीश रेड्डीसारखे फलंदाज आहेत, जे स्फोटक फलंदाजी करतात. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सकडे मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन आणि ऋषभ पंतसारखे उत्कृष्ट फलंदाज आहेत.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अॅडम झम्पा.
लखनौ सुपर जायंट्स - मिचेल मार्श, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग.