CSK vs KKR, IPL 2024 Pitch Report: चेपॉकच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत, फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
CSK Vs KKR (Photo Credit: File Photo)

CSK vs KKR, IPL 2024 22th Match: आयपीएल 2024 चा 22 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सोमवारी म्हणजेच 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. गेल्या दोन सामन्यांत सीएसकेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल. (हे देखील वाचा: CSK vs KKR, IPL 2024 Head to Head: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमनेसामने, आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व? घ्या जाणून)

खेळपट्टीचा अहवाल

वास्तविक, चेन्नईचे चेपॉक स्टेडियम फिरकीपटूंना मदत करण्यासाठी ओळखले जाते. पण, या मोसमात खेळपट्टीचे वेगळे रूप येथे पाहायला मिळाले. आता येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली आहे, तर फिरकी गोलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. टी-20 क्रिकेटच्या दृष्टिकोनातून येथील खेळपट्टी संतुलित असली तरी गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. चेन्नईने येथे दोन्ही सामन्यात मोठी धावसंख्या उभारली. बेंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने 173 धावांचा सहज पाठलाग केला. यानंतर सीएसकेने गुजरातविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या.

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी/मिशेल सँटनर, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षाना.

इम्पॅक्ट प्लेयर- मुकेश चौधरी

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सुनील नारायण, फिल सॉल्ट (विकेटकीपर), आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट प्लेयर- सुयश शर्मा.