CSK vs KKR, IPL 2024 Head to Head: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमनेसामने, आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व? घ्या जाणून
CSK vs KKR

CSK vs KKR, IPL 2024 22th Match: आयपीएल 2024 चा 22 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सोमवारी म्हणजेच 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. गेल्या दोन सामन्यांत सीएसकेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल. (हे देखील वाचा: CSK vs KKR, IPL 2024 22th Match Live Streaming: चेपॉकमध्ये आज कोलकाता चेन्नईशी भिडणार, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)

आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि कोलकाता संघ आतापर्यंत 29 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर केकेआरने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर चेपॉकमध्ये दोन्ही संघ 10 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नईने सात वेळा विजय मिळवला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षना.

केकेआरचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - सुनील नरेन, फिल सॉल्ट, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.