
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans, 19th Match: टाटा आयपीएल 2025 चा (TATA IPL 2025) 19 वा (Indian Premier League 2025) सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
कशी असणार खेळपट्टी?
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. हैदराबादमधील खेळपट्टी सपाट राहते, त्यामुळे येथे धावा करणे सोपे आहे. सामना जसजसा पुढे सरकतो तसतसे फिरकीपटूंनाही मदत मिळते. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना काही स्विंग मिळू शकेल. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 162 धावा आहेत. आयपीएलच्या इतिहासात, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 79 सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 35 सामने जिंकले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 43 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. हैदराबादने या मैदानावर त्यांचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला होता, जिथे त्यांना 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता.
हे देखील वाचा: SRH vs GT TATA IPL 2025 Mini Battle: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असतीलसर्वांच्या नजरा
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, सिमरजीत सिंग, मोहम्मद शमी, जीशान अन्सारी.
प्रभावशाली खेळाडू: ट्रॅव्हिस हेड
गुजरात टायटन्स- साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा.
प्रभावशाली खेळाडू: शेरफेन रदरफोर्ड