SL vs NZ (Photo Credit - X)

New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 2nd T20I Match Live Streaming: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे.

हे देखील वाचा: New Zealand vs Sri Lanka, 2nd T20I Match 2024 Live Streaming In India: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आज खेळला जाणार हाय व्होल्टेजचा सामना, येथे जाणून घ्या, थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद

हेड टू हेड रेकॉर्ड (NZ vs SL Head to Head Record)

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात न्यूझीलंड संघाचे पारडे जड झाले आहे. न्यूझीलंड संघाने 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेच्या संघाने केवळ 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर एकाही सामन्याचा निकाल लागलेला नाही. न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघाने सात सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्याच वेळी, 1 सामना बरोबरीत आहे.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल हे (विकेटकीपर), टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेकब डफी, मॅट हेन्री, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, झाकरी फोकस.

श्रीलंका : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, असिथा फर्नांडो, महिश थेक्षाना, मतिशा पाथिराना, नुवान तुषारा.