IND vs AFG T20 Head To Head Record: भारत आणि अफगाणिस्तान टी-20 मालिकेत कोण आहे वरचढ? येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी
IND vs AFG (Photo Credit - Twitter)

IND vs AFG T20 Series: टी-20 विश्वचषक 2024 च्या (ICC World Cup 2024) पूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका (IND vs AFG T20 Series) खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीच्या (Mohali) मैदानावर होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. टी-20 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. चला जाणून घेऊया टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघांचे रेकॉर्ड काय आहेत. (हे देखील वाचा: ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या 'या' युवा खेळाडूंवर असेल सर्वांच्या नजरा, यादीत यशस्वी जैस्वालच्या नावाचाही समावेश)

असा दोन्ही संघांचा विक्रम

टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चार सामने भारताने जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. अफगाणिस्तानच्या संघाने अद्याप भारताविरुद्ध एकही टी-20 सामना जिंकलेला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा वरचष्मा आहे. भारताने पहिला सामना 2010 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला होता.

विराट कोहलीने केल्या सर्वाधिक धावा 

अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 3 सामन्यात 172 धावा केल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने केवळ 1 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघासाठी ही मालिका महत्त्वाची 

टी-20 विश्वचषक 2024 पूर्वी भारताची ही शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला खेळाडूंची चाचपणी करून सांघिक संयोजन करण्याची ही शेवटची संधी आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दुखापतींमुळे या मालिकेत भाग घेणे कठीण दिसत आहे. तर अफगाणिस्तानकडे असे खेळाडू आहेत, जे टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग करू शकतात.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ:

इब्राहिम झदरन (कर्णधार), रेहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.