Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 मार्च 2023 रोजी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे, अशा परिस्थितीत दोघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कौटुंबिक कारणांमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यात उपलब्ध नसला तरी या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघाची धुरा सांभाळणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडूनही त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेतून बाहेर पडला असून स्टीव्ह स्मिथ जबाबदारी सांभाळणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोणाचे आहे वर्चस्व?

भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत 143 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने यातील 53 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 64 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 29 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले आहेत. यादरम्यान 5 सामने अनिर्णित राहिले आहेत. (हे देखील वाचा: WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7व्यांदा होणार फायनल, जाणून घ्या आतापर्यंत कोणाचं पारड आहे जड; पहा आकडे)

येथे पहा मालिकेचे वेळापत्रक 

पहिला वनडे सामना: 17 मार्च - वानखेडे क्रिकेट स्टेडियम, मुंबई

दुसरा वनडे सामना: 19 मार्च – YS राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम

तिसरा वनडे सामना: 22 मार्च, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही सघांचे खेळाडू

टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा