उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras) येथील सामुहिक बालात्कार प्रकरणातील 19 वर्षीय पीडित तरूणीची आज मृत्यूशी झंज अपयशी ठरली आहे. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपाचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून तिच्यावर उपचार सुरु होते. पीडित 14 सप्टेंबरला गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार झाला होता. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार आरोपी तरुणांनी बलात्कार करुन तिची जीभ छाटून तिची मान मोडण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संपातजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर विराट कोहली याने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये विराट म्हणाला आहे की, हाथरसमध्ये जे घडले ते अमानुष आणि क्रूरतेच्या पलीकडे आहे. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आशा करतो, असेही तो म्हणाला आहे. दरम्यान, सर्वसामन्यांसह राजकीय, क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातूनदेखील या घटनेसंदर्भात रोष व्यक्त करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Hathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
पीडित तरूणी रुग्णालयात उपचार घेत असताना भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीची भेट घेतली होती. तसेच याप्रकरणी भारतीय समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायवती यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देशातून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रकरण अधिकच तापल्यानंतर उत्तर प्रदेशच्या सरकारने पीडिताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, समाजात महिलांवरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. यातच हाथरस येथील घटनेने यात आणखी भर घातली आहे. ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.