Hathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh)  हाथरस (Hathras)  जिल्हा मध्ये 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्यानंतर आज (29 सप्टेंबर) उपचारा दरम्यान तिचं निधन झालं आहे. दरम्यान ही मुलगी दलित समाजातील असून तिच्यावर उच्च जातीतील 4 पुरूषांकडून बलात्कार करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे. काल या तरूणीला दिल्लीच्या सफदरजंग (Safdarjung hospital)  रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 14 सप्टेंबर दिवशी तिच्यावर बलात्कार झाला असून त्यानंतर प्रकृतीमध्ये सुधार न झाल्याने तिला दिल्लीच्या रूग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. सुरूवातील हाथरस जिल्हा रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते मात्र प्रकृती सुधारत नसल्याने तिला दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. या बलात्कार प्रकरणी 4 जण पोलिस ताब्यात आहेत.

कोर्टात दिलेल्या जबाबामध्ये पीडित मुलीने तिच्यावर 4 जणांकडून बलात्कार झाल्याची माहिती दिली आहे. जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जाताना तिच्यावर 4 पुरूषांकडून बलात्कार झाला. यामध्ये तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न झाला. या झटपाटीमध्ये तिला जबर जखमा झाल्या. जीभेला, मानेजवळ, पाठीजवळ हाडांना दुखापत झाली.

हाथरस जिल्ह्यामध्ये 19 वर्षीय बलात्कार करणार्‍यांमध्ये संदीप, लवकुश, रामू आणि रवि या 4 जणांचे नाव तिने घेतले आहे. दरम्यान तिला मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या वेळी तरूणीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीभेला दुखापत झाली. मुलीच्या मदतीला ग्रामस्थ आल्यानंतर आरोपी फरार झाले मात्र पोलिसांनी थोड्या वेळातच चौघांनाही अटक केली आहे.