Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार, 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळणार आहे.
पहिल्या दिवशी किती टक्के पावसाची शक्यता
जर आपण हवामानाबद्दल बोललो तर, शुक्रवारी ॲडलेडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार पावसाची 40 टक्के शक्यता आहे. दुपारी पाऊस पडू शकतो. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर ते 30 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आकाशात ढगही असतील. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2024 Weather Report: ॲडलेड कसोटी सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? कसे असणार पाच दिवसाचे हवामान? एका क्लिकवर घ्या जाणून)
ॲडलेडच्या डे-नाईट कसोटीत खेळपट्टी कोणाला साथ देईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये डे-नाईट सामना रंगणार आहे. खेळपट्टीची भूमिका येथे खूप महत्त्वाची असेल. मिळालेल्या बातमीनुसार, खेळपट्टीचे वर्तन वेळ जात असताना बदलेल. ॲडलेड ओव्हलचे हेड क्युरेटर डॅमियन ह्युजेस म्हणाले की, ते खूप संतुलित असेल. पण पाऊस खेळपट्टीचा स्वभाव बदलू शकतो.
ॲडलेडमध्ये भारताचा कसा आहे रेकाॅर्ड इतिहास कसा आहे?
ॲडलेडमध्ये भारतीय संघाचा विक्रम निराशाजनक राहिला आहे. भारताने ॲडलेडच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 12 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाला 7 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.