Bangladesh Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 13 वा सामना आज 10 ऑक्टोबर रोजी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशचा आठ विकेट्सने पराभव केला आहे. यासह वेस्ट इंडिज अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. तर बांगलादेशचा प्रवास जवळपास संपला आहे. (हे देखील वाचा: India Women Beat Sri Lanka Women 12th Match Scorecard: भारताने श्रीलंकेकडून आशिया चषकातील अंतिम फेरीतील पराभवाचा घेतला बदला, दणदणीत विजयासह उपांत्य फेरीच्या आशा ठेवल्या जिवंत)
An emphatic win for West Indies, who jump to the top of Group B 🌟https://t.co/gD5NKGWn2y #BANvWI #T20WorldCup pic.twitter.com/J5yaiVLqJp
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 10, 2024
दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 33 धावा करून संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शोभना मोस्तारी आणि निगार सुलताना यांनी मिळून डाव सांभाळला. बांगलादेश संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 103 धावा केल्या. बांगलादेशकडून निगार सुलतानाने सर्वाधिक 39 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान निगार सुलतानाने 44 चेंडूत चार चौकार मारले. निगार सुलतानाशिवाय दिलारा अख्तरने 19 धावा केल्या.
करिश्मा रामहारिकने वेस्ट इंडिज संघाला पहिले यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून करिश्मा रामहारिकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. करिश्मा रामहारिकशिवाय आफी फ्लेचरने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 20 षटकात 104 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि स्टॅफनी टेलर यांनी शानदार फलंदाजी करत 52 धावा जोडल्या.
वेस्ट इंडिज संघाने 12.5 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक 34 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान हेली मॅथ्यूजने 22 चेंडूत सहा चौकार ठोकले. हेली मॅथ्यूजशिवाय स्टॅफनी टेलरने नाबाद 27 धावा केल्या. मारुफा अख्तरने बांगलादेश संघाला पहिले यश मिळवून दिले. बांगलादेशकडून मारुफा अख्तर आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.